‘सारा’ला उचलून घेऊन ‘असा’ नाचला कार्तिक आर्यन (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टारा कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सध्या आगामी सिनेमा लव आज कल 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. नुकतेच ते प्रमोशनसाठी अहमदाबादला गेले होते. त्यावेळी प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडीओ कार्तिकनं सोशलवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत कार्तिक आणि सारा त्यांच्या सिनेमातील हा मै गलत या गाण्यावर डान्स करत आहेत. यावेळी चाहतेही खूप उत्साहित होते.

व्हिडीओत दिसत आहे की, कार्तिक आणि सारा हा मै गलत गाण्यावर डान्स करत आहेत. अशात कार्तिक अचानक तिला उलचून घेतो. यानंतर सारासोबत सर्वच हैराण होतात. विशेष म्हणजे जेव्हा कार्तिक सारा उचलून घेतो तेव्हा चाहतेही खूप आनंदी झाल्याचं दिसून येतं. कार्तिकनं स्वत: इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर सारा अली खाननं ट्रॅडिशनल ड्रेस घातला आहे. तर कार्तिकच्या आउटफिटबद्दल बोलायचं झालं तर तो व्हाईट टी शर्ट आणि ऑरेंज जॅकेटमध्ये दिसत आहे. कॅज्युअल लुकमध्ये कार्तिक कूल दिसत आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचा लव आज कल 2 हा सिनेमा वॅलेंटाईन डेच्या दिवशीच म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात कार्तिक आणि सारा यांच्या व्यतिरीक्त रणदीप हुड्डा देखील दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. चाहत्यांचा मोठा प्रतिसाद ट्रेलरला मिळाला होता. हम भी अकेले तुम भी अकेले या सिनेमासोबत हा सिनेमा क्लॅश होणार आहे.