मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा सध्या खूपच चर्चेत आहे. कार्तिकने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कार्तिकने त्याच्या अभिनयाचे ठसे उमटवत प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत. दिवसेंदिवस कार्तिकचे (Kartik Aaryan) चाहते हे वाढत असताना दिसत आहे. पण काही दिवसापूर्वी रिलीज झालेला ‘शेहजादा’ चित्रपट मात्र प्रेक्षकांवर फारशी जादू करताना दिसला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला गेला. आता कार्तिकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कार्तिकने स्वतः त्याच्या खाजगी आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट शेअर केली आहे.
शेहजादा या चित्रपटाने जरी प्रेक्षकांवर भुरळ पाडले नसले तरी चाहते कार्तिकला (Kartik Aaryan) पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये कार्तिकने त्याच्या लग्नाविषयी बातमी शेअर केली आहे. कार्तिकने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की कार्तिक बँड घेऊन स्टेजवर प्रवेश करतो. यावेळी कार्तिक म्हणतो की, “हसत हसत सर्वांना नमस्ते तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की मी माझ्यासोबत हे बँड का आणले आहे.
आता बघा ना बॉलीवूड मध्ये सर्वांचेच बँड वाजले आहेत. सर्वजण घोडी चढले आहेत. आता केवळ मी एकटाच शिल्लक राहिलो आहे. म्हटलं आता मी देखील लग्नाचे लाडू खाऊन पहावेत. सर्वांचे लग्न होताना पाहून मलाही लग्न करावे अशी इच्छा निर्माण झाली आहे. मी आधीच प्रेमाचा पंचनामा केला आहे आणि आता मी लग्नाचा ही पंचनामा करण्यासाठी सज्ज झालो आहे. मी आज तुम्हा सर्वांना साक्षी मानून माझ्या सर्व चाहत्यांना आणि इंडस्ट्रीतील सर्वांना ही बातमी देऊ इच्छितो की मी लवकरच लग्न करणार आहे”. कार्तिकच्या बोलण्याने उपस्थित कलाकारांना मोठा धक्का बसला.
कार्तिकने जरी मजेत ही घोषणा केली असली तरी चाहत्यांना मात्र आता त्याच्या लग्नाची आस लागली आहे.
अनेक दिवसांपासून कार्तिकचे नाव सारा अली खान सोबत जोडले गेले होते.
तर आता कार्तिक हा ऋतिक रोशनची बहीण पश्मिना सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे आता नक्की कार्तिक कोणाशी लग्न करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
कार्तिकच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास नुकताच त्याचा शेहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
तर येणाऱ्या दिवसात तो ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट, ‘आशिकी 3’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटात झळकणार आहे.
Web Title :- Kartik Aaryan| Karthik Aryan made a big announcement; Soon will get stuck in marriage
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chhagan Bhujbal | ‘फडणवीसांना ‘या’ पदावर बघायला आवडेल’, छगन भुजबळांनी सांगितली ‘मन की बात’
Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…