Karuna Munde | बीड पोलीस करुणा मुंडे यांच्या सांताक्रुझमधील निवासस्थानी दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Karuna Munde | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या मुंबईच्या सांताक्रुझ येथील निवासस्थानी बीड पोलीस (Beed Police) दाखल झाल्याची माहिती समजते. आयपीएस अधिकारी सुनील जायभये (IPS officer Sunil Jayabhaye) यांच्यासह हे पथक मुंबईमध्ये दाखल झाल्याचं सुत्राकडुन सांगण्यात येत आहे. दरम्यान जायभये यांनी कोणतीही अधिक माहीती दिली नाही. मात्र, हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात (Santa Cruz Police Station) असल्याचं देखील माहिती समोर येत आहे.

करुणा मुंडे यांच्यावर 5 सप्टेंबर रोजी जातिवाचक शिवीगाळ करून चाकूहल्ला केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यावेळी त्या परळी (Parli) दौऱ्यावर आल्या होत्या. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे सादर करू असे घोषित करणाऱ्या करुणा शर्मा यांना जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल ठेवल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) ठोठावण्यात आली. या बरोबरच त्याच्या चालकाला देखील एक दिवसाची पोलिस कोठडी (Police cell) ठोठावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने (Ambajogai Court) हा निर्णय दिला आहे.

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत कोकणात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह पुण्याला इशारा

5 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता त्या बेबी छोटूमियां तांबोळी (Baby Chhotumiyan Tamboli) यांच्यासह वैद्यनाथ मंदिरात दर्शनसाठी गेल्या होत्या. यावेळी करुणा मुंडे आणि अरुण मोरे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द काढत होते. याचा जाब विचारल्याने करुणा मुंडेंनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत बेबी छोटूमियां तांबोळी हिच्या उजव्या हातास धरून खाली पाडले, तर अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने त्यांच्या पोटावर वार केला. असं विशाखा रविकांत घाडगे (Visakha Ravikant Ghadge) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान, करुणा मुंडे यांच्या तक्रारीवरुन जमावाविरुध्द कोविड नियमांचा भंग करुन बेकायदेशीर गर्दी
जमविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची निष्काळजी झाली असेल तर
चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, असं जिल्हा पोलीस प्रमुख आर. राजा (SP. R.Raja) यांनी सांगितलं आहे.