Karuna Munde | करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं… (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा (Karuna Munde) या रविवारी परळी येथे आल्या होत्या. त्यांनी शहरात प्रवेश करताच मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करुन त्यांना घेराव घातला. दरम्यान, त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल (Pistol) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. करुणा शर्मा (Karuna Munde) यांच्यावर सायंकाळी अ‍ॅट्रॉसिटी (Atrocity) व खुनाच्या प्रयत्नाचा (attempted murder) गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कायदा व सुव्यवस्थेचं चित्र स्पष्ट होतंय, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेद्र फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशीची मागणी केली आहे.
या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे.
त्यापासून कुणालाही वंचित ठेवता येणार नाही.
तेथे जे काही घडलंय, त्यावरुन कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) कशा प्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय.
हे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, विशेषत: गाडीत पिस्तुल ठावल्याचा, हे अतिशय गंभीर आहे.
या घटनेची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. कुठल्याही दबावाशिवाय चौकशी झाली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विशाखा घडगे (Visakha Ghadge) यांनी शर्मा व अरुण मोरे (Arun More) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, वैद्यनाथ मंदिरासमोर घाडगे यांना जातिवाचक शिवीगाळ का करता, असे विचारल्याने शर्मा यांनी बेबी तांबोळी (Baby Tamboli) यांना ओढून खाली पाडले तर अरुण मोरे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर चाकूने वार केला.
जखमी तांबोळींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घाडगे यांच्या तक्रारीवरुन अ‍ॅट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

 

पिस्तूल ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल

करुणा शर्मा यांच्या गाडीतून पिस्तूल जप्त केले होते.
मात्र, काही वेळाने वैद्यनाथ मंदिराजवळून त्यांची गाडी मार्गस्थ होताना मागील डिकी उघडून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने काहीतरी वस्तू गाडीत ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
गाडीत आढळलेले पिस्तूल त्या व्यक्तीनेच ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

Web Title : Karuna Munde | karuna munde video karuna munde putting pistol his car fadnavis clearly stated

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Update | 9000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झालं सोनं, इथं जाणून घ्या 14,18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

Ahmednagar Crime | धक्कादायक ! पती-पत्नीची 10 वर्षीय मैथिलीसह गळफास घेऊन आत्महत्या, तिघांच्या ‘सुसाईड’मुळं अहमदनगरमध्ये प्रचंड खळबळ

UPI Payment | इंटरनेटशिवाय करता येते पेमेंट, जाणून घ्या UPI पेमेंटची पूर्ण प्रक्रिया