कठुआ बलात्कार प्रकरणात ७ पैकी ५ आरोपींना १७ महिन्यानंतर शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील कठुआ येथे झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ७ पैकी पाच जणांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. पठाणकोटमधील न्यायालायने त्यांना दोषी ठरवले आहे. सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू आणि काश्मीर बाहेर घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पठाणकोट येथील सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी घेण्यात आली.

कठुआ येथील एका आठ वर्षीय मुलीचे १० जानेवारी २०१८ रोजी घरातून अपहरण कारून तिला आठ दिवस बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला . त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आला होता. संपूर्ण देशभरात या प्रकरणामुळे खळबळ माजली होती. या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपीना अटक केली होती. यातील पाच जणांना न्यायालायात दोषी ठरवले असून बाकी दोन जणांना निर्दोष सोडले आहे. मुख्य आरोपी सांजी राम, त्याचा मुलगा विशाल, दीपक खजुरिया , सुरेंदर वर्मा, आणि टिळक राज या पाच आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले आहे.

दरम्यान, या संपूर्ण खटल्यात न्यायालयाने १४४ साक्षीदार तपासले होते. या प्रकरणात एक आरोपी अल्पवयीन असून त्याचे प्रकरण जम्मूकाश्मीरमधील न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचबरोबर या प्रकरणात मुलीची वकील असणाऱ्या दीपिका सिंह यांना देखील मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास देण्यात आला.

आरोग्य विषयक वृत्त –
देहूत महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर तपासणी

वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांच्या श्वसनविकारमध्ये वाढ

काय सांगताय, हो आता ‘ब्लड ग्रुप’ वरून कळेल प्रत्येकाचा ‘स्वभाव’ !