Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी मंजूर झालेला २०० कोटीचा निधी गेला कुठे? फडणवीसांच्या घोषणेला ६ महिने पूर्ण

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याचे (Katraj-Kondhwa Road) रुंदीकरण निधीअभावी रखडले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी २०० कोटी रूपये मंजूर केल्याचे जाहीर केले होते. मे महिन्याच्या अखेरीस हा निधी मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र, फडणवीसांच्या या घोषणेला सहा महिने झाले तरी अद्याप निधी महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) तिजोरीत आलेला नाही. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी (Katraj-Kondhwa Road) भुसंपादन कधी होणार आणि काम कधी पुर्ण होणार असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कात्रज आणि इतर गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर येथील लोकसंख्या वेगाने वाढू लागली आहे. यामुळे रस्ते आणि वाहतुकीचा प्रश्न जटील होत चालला आहे. बाह्यवळण रस्ताही कमी पडत आहे.

कात्रज-कोंढवा ८४ मीटर डीपी रोडच्या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता मिळाली. राजस सोसायटी ते खडी मशीन चौक आणि पिसोळी पालिका हद्द असा हा प्रस्तावित मार्ग असून त्यासाठी २४१ कोटींचा खर्च येणार आहे. मात्र, निधीअभावी सध्या केवळ ४८ कोटीच खर्च झाले आहेत.

या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करणे आवश्यक असून त्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणा आवश्यकता आहे. भूसंपादनासाठी ७१० कोटींची गरज आहे. सध्या राजस सोसायटी ते कपिलामृत डेअरीपर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे, पण त्यापुढे काम झालेले नाही. खडी मशीन चौकाच्या अलीकडे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे; पण त्यापुढेही काम झालेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम सलग न झालेले नाही, त्यामुळे कुचकामी ठरत आहे. (Katraj-Kondhwa Road)

भूसंपादनाचा अवाढव्य खर्च पाहता कात्रज-कोंढवा रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदी करण्यात येणार आहे. यामुळे सायकल ट्रॅक,
पदपथ आणि वृक्षारोपणासाठीचा ग्रीन ट्रॅक या कामांना कात्री लावण्यात आली आहे. केवळ सर्व्हिंस रोड होणार आहे.

टीडीआरचे दर कमी झाल्यामुळे जागा मालक भूसंपादनासाठी रोख रक्कम मागत आहेत.
भूसंपादनाच्या २८० कोटी खर्चापैकी २०० कोटी रुपये सरकारकडून महापालिका घेणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. परंतु, निधीला मंजुरीच मिळत नव्हती,
सातत्याने पाठपुरवा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील
एका कार्यक्रमात रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजुर केल्याची घोषणा केली.

यावेळी फडणवीस यांनी हा निधी पालिकेला मे महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल, असेही आश्वासन दिले होते.
मात्र, अजूनही तो न मिळाल्याने बहुचर्चित कात्रज-कोंढवा रोडचे काम रखडले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भोसरीत ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने लंपास, दोन महिलांवर FIR