Katrina Kaif | कतरिनाने शेअर केली सर्वात जास्त सोबत वेळ घालवणाऱ्या व्यक्तीसाठी स्पेशल पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेली अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री कतरिना ही अनेक वर्षांपासून बी-टाऊन मध्ये हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या अभिनयावर व नृत्यावर चाहते फिदा आहेत. कतरिनाने (Katrina Kaif) बॉलीवुडमध्ये सर्वात जास्त काळ घालवलेल्या स्पेशल व्यक्तीसाठी प्रेमळ पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनभरुन मनोरंजन केले आहे. कतरिनाने तिने सर्वांत जास्त वेळ घालवलेल्या व्यक्तीसाठी पोस्ट लिहिली आहे. (Katrina Kaif Special Person) कतरिनाने तिचा पती विकी कौशल (Vicky Kaushal) पेक्षा या व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवला आहे. तिच्या सिनेविश्वातील यशस्वी वाटचालीमध्ये तिला एका व्यक्तीची बहुमोल व्यक्तीची साथ लाभली आहे. ती व्यक्ती म्हणजे कतरिनाचे पर्सनल असिस्टेंट अशोक शर्मा (Ashok Sharma) आहेत. अशोक व कतरिना 20 वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. पदोपदी त्यांनी कतरिनाची साथ दिली आहे. या स्पेशल व्यक्तीसाठी अभिनेत्री कतरिना कैफने भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कतरिनाने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर पर्सनल असिस्टेंट अशोक शर्मा (Katrina Kaif Personal Assistant) यांच्यासोबतचा फोटो अपलोड केला आहे. यामध्ये तिने कॅप्शनमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. कतरिनाने लिहिले आहे की, “आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत मिस्टर अशोक वर्मा. त्याच्यासोबत गेल्या 20 वर्षांमध्ये मी माझा सर्वात जास्त वेळ घालवला आहे. गमतीदार व हसण्यापासून ते प्रेरणादायी गप्पा ते पाहिजे ते प्यायला मिळाल्यामुळे भांडणापर्यंत किंवा मला खरोखर काय हवे आहे याबद्दल माझे मत बदलणे. एवढेच काय मला सेटवर कोणी मला काय बोलले तर अशोक रडले देखील आहेत. या सगळ्यात आम्ही एकत्र राहिलो. त्याचा मनमिळाऊ चेहरा, सतत मला काय हवे आहे हे मला समजण्यापूर्वी करणारे ते माझ्यावर नेहमी लक्ष ठेवतात आणि पुढील 20 वर्षे सुद्धा ठेवणार”

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हिने आपल्या पर्सनल असिस्टेंट अशोक शर्मा यांच्यासाठी लिहिलेल्या भावनिक पोस्टचे
सर्वजण कौतुक करत आहे. बी-टाऊनमधील (Bollywood News) अनेक कलाकरांनी सुद्धा कमेंट केल्या आहेत.
प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) ‘बेस्ट’ अशी कमेंट केली आहे तर सोनल चौहान (Sonal Chauhan) हिने ‘किती प्रेमळ पोस्ट आहे’
अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच मेरी क्रिसमस (Merry Christmas) व सलमान खान (Salman Khan)
सोबत टायगर 3 (Tiger 3) मध्ये झळकणार आहे.

Web Title :  Katrina Kaif | katrina kaif shares picture with the man he spent the most time with it is not vicky kaushal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | समाज माध्यमांवर घातक शस्त्रांचा फोटो ठेऊन दहशत निर्माण करणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

Uddhav Thackeray | ‘माझा ‘कलंक’ शब्द एवढा प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले-‘मी जे म्हटलं ते योग्यच!’ (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | शिंदे गटाच्या आमदारांसाठी ‘मातोश्री’ची दारं खुली आहेत का?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… (व्हिडिओ)