Uddhav Thackeray | शिंदे गटाच्या आमदारांसाठी ‘मातोश्री’ची दारं खुली आहेत का?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विदर्भ दौऱ्यानंतर आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर भाष्य केलं. काल आणि परवा विदर्भाच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा (Vidharbha Daura) कार्यक्रम होता. तिथे पोहरादेवीचे दर्शन घेतले. अमरावती आणि नागपूरमध्ये मेळावा झाला. माझ्या स्वागतासाठी खूप लोक थांबले होते, त्यांच्यात उत्साह होता. त्यांच्या मनात सरकारच्या कारभारावर राग आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी सांगितले.

सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) नाराज असल्याची चर्चा सुरु आहेत, यातील काही आमदार मातोश्रीच्या (Matoshree) संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे गटातील आमदार नाराज आहेत की नाहीत याच्याशी माझा काहीही संबंध नाही. अजुनही या चर्चेत काही तथ्य नाही. ही फक्त चर्चाच आहे. काही दिवसापूर्वी शिवसेना नेते अरविंद सावंत (Shiv Sena Leader Arvind Sawant) यांनी शिंदे गटातील नेते संपर्कात असल्याचे सांगितले होते, या चर्चांना आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पूर्णविराम दिला.

माझ्या आजारपणाची काही दिवसांपासून चेष्टा करत आहेत. ते चालत, ही कोणती संस्कृती आहे.
2014 साली असं काय घडलं की तुम्ही युती तोडली. तुम्ही म्हणाल तो देव, तुम्ही म्हणाल तो डाकू मग तुम्ही आहात कोण,
असा सवाल त्यांनी विचारला. सध्या कोणता खेळाडू कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही. देशाचं राजकारण आयपीएल (IPL) सारखं
झालं आहे. देशातील सर्व यंत्रणा यांच्याच आहेत. ज्यांच्या चौकशा लागल्या आहेत त्यांनी क्लीन चीट मिळाल्या आहेत.
आमच्या माणसांच्या घरात घुसून चौकशी करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) राष्ट्रवादीच्या (NCP) नव्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ
घेतली आहे. त्यामुळे आता हे मंत्री शिंदेंच्या नाकीनऊ आले आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title : Uddhav Thackeray | are the doors of matoshree open for mlas with shinde uddhav thackeray cleared the issue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | वाहनांच्या तोडफोडीसह मोक्काच्या गुन्हयात 3 महिन्यांपासून फरार असलेल्या 3 आरोपींना कर्नाटकमधून अटक; गुन्हे शाखेनं काढली त्यांची धिंड (Video)

Deepika Padukone | दीपिका पादुकोणच्या एअरपोर्ट लूकने वेधले सर्वाचे लक्ष; जवानच्या ट्रेलरनंतर झाली मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

Saiee Manjrekar | महेश मांजरेकरांची मुलगी सईच्या मादक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

Bhojpuri Actress Monalisa | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे साडीतील फोटोशुट व्हायरल