Uddhav Thackeray | ‘माझा ‘कलंक’ शब्द एवढा प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले-‘मी जे म्हटलं ते योग्यच!’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी भाषणात कलंक हा शब्द वापरला त्यात चुकीचं काय बोललो? तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations of Corruption) करुन त्यांना कलंकितच करत आहात. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात (Cabinet) का घेता? माझा कलंक शब्द इतका प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं. जनाचं नाही किमान मनाचं भान ठेवा आरोप करताना. मला हे काही बोलताना गंमत वाटत नाही. अफझल खानाची (Afzal Khan) स्वारी असंही म्हटलं होतं. पण त्यामागे माझा हेतू हा होता की ईडी (ED) आणि आयकर (Income Tax) हे जे काही घराघरात घुसवत आहेत त्याचा अर्थ काय आहे? ते कुटुंब कलंकित होत नाही का? मी एक शब्द वापरला तर इतकी तळपायाची आग मस्तकात का गेली? असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला आहे. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यानंतर त्यांनी आज (मंगळवार) मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते.

तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करुन कलंकित करता

तुम्ही लोकांवर आरोप करता, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना कलंकित करता. त्यानंतर त्यांना मंत्रिपद देऊ पवित्र करुन घेता. मग त्यांचा उल्लेख कसा करायचा? संजय राऊत (Sanjay Raut) आणि अनिल परब (Anil Parab) यांना काय हे लोक कमी छळत आहेत का? कलंक काय होता ते मी दाखवून दिलं तर त्रास झाला. माझ्या झालेल्या ऑपरेशनवरुन माझी चेष्टा करतात. मी जे काही केलं ते कुणाला भोगावं लागू नये. कुणाच्या कुटुंबावर बोलता, प्रकृतीवर बोलता तो कलंक नाही का? असाही प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला.

उद्धव ठाकरेंचं ‘मिशन महाराष्ट्र’

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात आगामी काळात सभा घेणार असून जिथे जिथे जातोय तिथे छोट्या सभा होतच आहेत. सरकार दारोदारी जातंय पण दारातून परत येतंय. लोकांच्या घरामध्ये सर्व योजना पोहचल्या का? लोकांना सुख शांती लाभली का? याची कोणीही विचारपूस करत नाही. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना यामध्ये लक्ष घालण्यास सांगितलं आहे. ‘होऊन जाऊ दे चर्चा’ हा कार्यक्रम ठरवून दिला असून ते घरोघरी योजना पोहोचल्या का याची पाहणी करणार आहेत.

Web Title : Uddhav Thackeray | uddhav thackeray firm on his kalank word about devendra fadnavis and bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | वाहनांच्या तोडफोडीसह मोक्काच्या गुन्हयात 3 महिन्यांपासून फरार असलेल्या 3 आरोपींना कर्नाटकमधून अटक; गुन्हे शाखेनं काढली त्यांची धिंड (Video)

Deepika Padukone | दीपिका पादुकोणच्या एअरपोर्ट लूकने वेधले सर्वाचे लक्ष; जवानच्या ट्रेलरनंतर झाली मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

Saiee Manjrekar | महेश मांजरेकरांची मुलगी सईच्या मादक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

Bhojpuri Actress Monalisa | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे साडीतील फोटोशुट व्हायरल