Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा नागपुरात कार्यकर्त्या मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (सोमवारी) ट्विट करत ‘कलंकीचा काविळ’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर आज (मंगळवार) माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आमचे आताचे राजकीय विरोधक आणि पूर्वाश्रमीचे मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरित परिणाम झालेला दिसतो, या गोष्टीचं मला अत्यंत दु:ख आहे. कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा (Psychiatrist) सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशा मानसिकतेतून जर एखादी व्यक्ती बोलत असेल तर त्यावर बोलणं योग्य नाही. कारण ही एक मानसिक स्थिती आहे. ती आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया न देणं इष्ट, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला खोचक उत्तर दिलं.

चुकीचं काय बोललो? – उद्धव ठाकरे

मी भाषणात कलंक हा शब्द वापरला त्यात चुकीचं काय बोललो? तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations of Corruption) करुन
त्यांना कलंकितच करत आहात. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात (Cabinet) का घेता? माझा कलंक शब्द इतका प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं. जनाचं नाही किमान मनाचं भान ठेवा आरोप करताना. मला हे काही बोलताना गंमत वाटत नाही. अफझल खानाची (Afzal Khan) स्वारी असंही म्हटलं होतं. पण त्यामागे माझा हेतू हा होता की ईडी (ED) आणि आयकर (Income Tax) हे जे काही घराघरात घुसवत आहेत त्याचा अर्थ काय आहे? ते कुटुंब कलंकित होत नाही का? मी एक शब्द वापरला तर इतकी तळपायाची आग मस्तकात का गेली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यानंतर त्यांनी आज (मंगळवार) मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

Web Title :  Devendra Fadnavis | devendra fadnavis says uddhav thackeray needs psychiatrist as he is shocked with current political condition

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | वाहनांच्या तोडफोडीसह मोक्काच्या गुन्हयात 3 महिन्यांपासून फरार असलेल्या 3 आरोपींना कर्नाटकमधून अटक; गुन्हे शाखेनं काढली त्यांची धिंड (Video)

Deepika Padukone | दीपिका पादुकोणच्या एअरपोर्ट लूकने वेधले सर्वाचे लक्ष; जवानच्या ट्रेलरनंतर झाली मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

Saiee Manjrekar | महेश मांजरेकरांची मुलगी सईच्या मादक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

Bhojpuri Actress Monalisa | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे साडीतील फोटोशुट व्हायरल