FIR फेम कविता कौशिकनं बिकिनी घालून समुद्रकिनारी केला ‘असा’ योगा ! आसन पाहून चाहते ‘हैराण’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एफआयआर या टीव्ही मालिकेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री कविता कौशिक फिटनेस फ्रिक आहे. कविता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आता कविताचा एक फोटो समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत ती हॉट अवतारात दिसत आहे. खास बात अशी की, कविता योगा करताना दिसत आहे.

कवितानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळं कवितानं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण कवितानं बोल्ड बिकिनी घातली आहे. कविता तिची हॉट फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. कवितान चक्रासन केलं आहे. फोटो शेअर करताना या सगळ्याची गरज आहे असं ती म्हणत आहे. योगाला ती मिस करत आहे असं तिचं म्हणणं आहे. कविताचं हे आसन पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.

बिकिनी लुकमुळं कविताआणखीच हॉट दिसत आहे. कविताचा बोल्ड अवतार पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. सध्या तिचा हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे.

कविता आपली फिट बॉडी आणि हेल्दी लाईफचे सिक्रेट सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या फ्लेक्सिबल बॉडीमुळे कविता अनेक प्रकारच्या डान्स स्टाईल आणि स्टेप्स अगदी सहज करते. कविता यासाठी सर्टिफिकेटही मिळवलं आहे.

कविताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिची डू नॉट ड्रीम ही शॉर्ट फिल्म रिलीज आहे. अभिनव शुक्ला डायरेक्टेड या सिनेमाचं एडिटींगपासून तर प्रॉडक्शनपर्यंतचं सर्व काम कविताचा पती रोनित बिस्वास यानं सांभाळलं आहे. ही एक 13 मिनिटांची हॉरर फिल्म आहे. कवितां घरीच याची शुटींग केली आहे. एकता कपूरच्या कुटुंब या मालिकेतून तिनं टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. परंतु एफआयआर या मालिकेतील चंद्रमुखी चौटाला या भूमिकेने तिला खरी लोकप्रियता मिळाली. एफआयआर या मालिकेव्यतिरीक्त कवितानं कहानी घर घर की, रात होने को है, तुम्हारी दिशा, सीआयडी यांसारख्या अनेक मालिकेत काम केलं आहे.