Kaviya Maran | हैदराबादची मालकिण काविया मारन खूष ! 10 कोटी मोजलेल्या ‘त्या’ खेळाडूने दाखवला ‘ट्रेलर’, IPL मध्ये पाहायला मिळणार खरा ‘पिक्चर’?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kaviya Maran | भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (IND vs WI) झालेल्या टी – 20 आणि वनडे मालिकेत कॅरिबिअन संघाला पराभव पत्कारावा लागला. या मालिकेत विंडीजच्या खेळाडूंना आपली छाप पाडता आली नाही. काही खेळाडू सोडले तर सर्व संघाची कामगिरी खराब झाली. मात्र वेस्ट इंडिजकडून तिन्ही टी-20 सामन्यात निकोलस पूरनने अर्धशतक करत लक्ष वेधलं. आता पार पडलेल्या लिलावामध्ये हैदराबाद संघाने विकत घेतलं होतं. त्यामुळे सनराईझर्स हैदराबाद संघाची मालकिण काविया मारन (Kaviya Maran) खूष झाली आहे.

 

आयपीएलच्या लिलावात निकोलसला (Nicholas Puran) हैदराबाद संघाने 10.75 कोटी रूपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं होतं. भारताविरूद्ध केलेल्या तुफान फलंदाजीमुळे आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीची आशा हैदराबाद संघ आणि काविया मारन (Kaviya Maran) त्याच्याकडून ठेवेल. भारताविरूद्धच्या तिन्ही सामन्यात निकोलस पूरनने 61, 62 आणि 61 धावा केल्या.

 

निकोलसने एका टी-20 मालिकेत भारताविरूद्ध सर्वाधिक धावा फटकावण्याच्या यादीत प्रथम कमांक मारला आहे. त्याने विक्रमी 184 धावा केल्या आहेत. याआधी हा पराक्रम कॉलिन मुन्रोच्या (Colin Munro) नावावर होता, त्याने 2020 साली 178 धावा काढल्या होत्या. त्यापाठोपाठ इग्लंडच्या जोस बटरलने (Jose Butler) 172 धावा काढल्या होत्या.

दरम्यान, निकोलस याआधी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाकडून खेळत होता.
मात्र पंजाब संघाने त्याला रिलीज केलं आहे.
कारण मागील आयपीएलच्या मोसमात त्याला 11 सामन्यात अवघ्या 85 धावा फटकावता आल्या.
त्यानंतर टी-20 विश्वचषकातही (T20 World Cup) चमक दाखवता आली नव्हती.
मात्र मागील तिन्ही सामन्यातील त्याची फलंदाजी पाहून हैदराबाद संघाच्या अपेक्षा त्याच्याकडून वाढल्या आहेत.

 

Web Title :- Kaviya Maran | Kaviya Maran is very happy oversrhs new recruit nicholas pooran score most runs vs india in a t20i series ahead of ipl 2022 season

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा