धक्कादायक ! KEM मधील शिकाऊ डॉक्टरची घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे देशाभरात डॉक्टरांना मारहाण केल्यावरून डॉक्टर संपावर असताना के. ई. एममध्ये फिजीओथेरेपीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या शिकाऊ डॉक्टरने आपल्या राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे दादर येथे उघडकिस आला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

ओंकार महेश ठाकूर (वय २१ वर्षे, रा. ठी. कोहिनूर टॉवर, बाल गोविंदास रोड, A विंग, रुम नं. ५०३, दादर (पं) मुंबई) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ओंकार ठाकूर हे दादर येथील कोहिनूर टॉवरमध्ये वास्तव्यास होते. ते केईएम रुग्णालयात फिजीओथेरेपीचे शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होते. दरम्यान आज पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या टेरेसमवरून उडी मारली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या ठाकूर यांना सायन येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. तर डॉक्टरांच्या आंदोलनाचा किंवा इतर कोणत्या प्रकाराचा त्यांच्या आत्महत्येशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहे.

आरोग्य विषय वृत्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?