‘मोदी अन् शहा आले तरी एकही जागा मिळणार नाही, उगाच…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  केरळमध्ये विधानसभा निवडणुक प्रचाराने वातावरण ढवळून निघाले आहे. केरळमध्ये सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डावी लोकशाही आघाडी सत्तेत आहे. मात्र यंदा परिवर्तन होणार असा ठाम विश्वास काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. एक्झिट पोलचे आकडे आम्हाला मान्य नाहीत. आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असे चेन्निथला म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येवो किंवा गृहमंत्री अमित शहा भाजपला एकही जागा मिळणार नाही, त्यामुळे भाजप नेत्यांनी मोदी, शहांचा वेळ वाया घालवू नये. असा टोला त्यांनी लगावला आहे.

केरळमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून चेन्निथला यांनी जोरदार टोलेबाजी केली. मोदी किंवा शहा आले तरी येथे भाजपला एकही जागा मिळणार नाही. भाजपला राज्यात कोणतेही स्थान नाही, हे मतदारांना माहित आहे. आमची थेट लढत एलडीएफसोबत असल्याचे चेन्निथला यांनी सांगतले आहे. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) विरुद्ध काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी (युडीएफ) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना आलटून पालटून सत्ता मिळते. केरळचा राजकीय इतिहास तसा राहिलेला आहे. मात्र यंदा सत्तापरिवर्तन होणार नाही, असा अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे