सासरच्या 6 जणांना सायनाईड देऊन मारणार्‍या महिलेनं केलं ‘असं’ काही, जेलमध्ये कापली होती हाताची ‘नस’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केरळमधील कोझिकोड येथे सायनाइड (Cynide Murder) देऊन आपल्याच सासरच्या ६ जणांची हत्या करणाऱ्या आरोपीने तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोझीकोड कारागृहात असलेल्या जॉलीने आपल्याच हाताची नस कापली आहे. दरम्यान तिला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, तिची प्रकृती आता स्थिर आहे. जॉलीवर गेल्या १४ वर्षांपासून तिचा पती, सासू आणि सासऱ्यासहित एकूण सहा जणांच्या हत्येचा आरोप आहे. ज्यामध्ये दोन वर्षाच्या एका मुलीचा देखील समावेश आहे.

सर्वांची हत्या एकाच पद्धतीने केली गेली होती. सर्वांच्या अन्नात सायनाइड मिसळून मारण्यात आले होते. एकाचवेळी हत्या न झाल्याने कुटुंबीय व शेजाऱ्यांनीही यास नैसर्गिक मृत्यू मानले होते, परंतु एका पुराव्यामुळे पोलिसांना जॉलीचा संशय आला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. पोलिस चौकशी दरम्यान या सर्व हत्या तिने केल्याची कबुली दिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्रकरण कोझिकोडमधील कुथडई गावचे आहे. या खेड्यातील रहिवासी रॉय थॉमसचे लग्न जॉलीशी झाले होते. घरात रॉय थॉमस आणि जॉली व्यतिरिक्त रॉय थॉमसचे वडील टॉम जोस, आई अनम्मा थॉमस, अनम्माचा भाऊ मॅथ्यू मंजाडिल, टॉम जोसचा भाऊ जचारिया चा मुलगा शाजू, त्याची पत्नी सिली आणि दोन वर्षांची मुलगी अल्फोन्सा होते. २००२ मध्ये ५७ वर्षाच्या अनम्मा थॉमस यांचे निधन झाले. घरातील लोकांना वाटले की हा एक नैसर्गिक मृत्यू आहे. त्यानंतर २००८ मध्ये अनम्माचा पती टॉम जोस यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याला देखील नैसर्गिक मृत्यू मानले जात होते, परंतु २०११ मध्ये टॉम आणि अनम्माचा मुलगा रॉय थॉमस यांचेही निधन झाले. तेव्हा रॉय थॉमसचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत हा नैसर्गिक मृत्यू मानला जात होता.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सायनाइडमूळे मृत्यू झाल्याचे समोर आले

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण हे सायनाइड डोस असल्याचे आढळले. पोलिसांनी याला आत्महत्या म्हणून सांगितले. २०१४ मध्ये अनम्माचा भाऊ मॅथ्यू यांचेही निधन झाले. त्याच वर्षी शाजू आणि सिलीची दोन वर्षांची मुलगी अल्फोन्सा हिचे देखील निधन झाले. २०१६ मध्ये सिली चे देखील निधन झाले.