महाराष्ट्रासह ‘या’ ५ राज्यात महापुरामुळं ‘हाहाकार’, आत्तापर्यंत १५० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश सकट अनेक ठिकाणी देशात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. पुरस्थितीमुळे १५० हुन अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. हवामान खात्याने जोरदार वाऱ्यासह केरळमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. एन डी आर एफच्या टीम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तैनाद करण्यात आल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह आज कर्नाटकच्या ‘बेळगाव’चा दौरा करणार आहेत तर राहुल गांधी आज ‘वायनाड’च्या दौऱ्यावर असतील.

कर्नाटकमध्ये आतापर्यंत ३१ जण दगावले
कर्नाटकात पुरामुळे भयानक स्थिती निर्माण झालेली आहे, आतापर्यंत कर्नाटकमध्ये ३१ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गृहमंत्री आज बेळगाव दौऱ्यावर आहे.

गुजरात – 31 जणांचा बळी
सुरेंद्रनगर येथे शनिवारी बावडी नदीमध्ये १२ लोक अडकले होते, त्यांच्यापैकी ६ जण पाण्यामध्ये वाहून गेले उरलेल्या सहा लोकांना एन डी आर एफच्या टीमने वाचवले आणि वाहून गेलेल्या सहा जणांचे मृतदेह नदीच्या किनाऱ्यावर सापडले.

महाराष्ट्र – पूरग्रस्तांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत, सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. कोल्हापुरातील शिरोळ गावामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणी भरलेले आहे. एन डी आर एफची टीम ताकदीने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, कोकणासह विदर्भातील काही राज्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. त्यात सांगली, कोल्हापूरची स्थिती भयावह बनली आहे. आतापर्यंत या जिल्ह्यांमध्ये एकूण 27 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळमध्ये बचाव कार्य करणारी बोट उलटून आतापर्यंत 17 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

केरळमध्ये आतापर्यंत 57 जणांचा बळी
८ ऑगस्टरोजी मलप्पुरम जिल्ह्याच्या नीलांबुरच्या कवलप्परा येथे झालेल्या जमीन खचण्याच्या प्रकारामध्ये आतापर्यंत ९ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

 

तसेच केरळमधील रेल्वे सेवा पावसामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली असून रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –