केरळमध्ये ‘हाहाकार’ ! महापुरामुळे 113 जणांचा मृत्यू तर 29 नागरिक बेपत्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पावसाचा सपाटा अजूनही देशामध्ये सुरूच आहे. पूरग्रस्त परिस्थितीशी लोक दोन हात करताहेत. केरळ, हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. केरळमध्ये अनेक मदत कॅम्प पूरग्रस्तांसाठी सुरु करण्यात आले आहेत. आता पुराचे पाणी ओसरायला लागल्यावर हळू हळू लोक आपल्या घराकडे परतत आहेत. मात्र राज्यातील मृतांची संख्या 113 वर पोहोचली आहे.

हैदराबाद येथील एक विशेष टीम कवलप्परा येथे जीपीआरसह दाखल होत आहे. या माध्यमातून ढिगाऱ्याखाली दडलेल्या मृतदेहांचा शोध लावता येणार आहे. मलप्पुरममध्ये 21, वायनाडमध्ये 7 आणि कोट्टायममध्ये १ जण बेपत्ता आहे. मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सर्वसामान्य लोकांची घरे, रस्ते अशा सर्वच गोष्टींची हाणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. यामध्ये पाऊस आणि पुरामुळे 12761 घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 1186 घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. 805 शिबिरात 129517 लोक राहत आहेत. महापुरामुळे 113 जण दगावले आहेत तर 29 नागरिक अद्याप बेपत्ता आहेत.

राजस्थान, कोलकत्ता, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये मदत कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. महापूरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदत कार्य सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –