Kesari Trailer :अक्षयच्या बहुचर्चित ‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई :वृत्तसंस्था- अभिनेता अक्षय कुमारचा बहूचर्चित ‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाले आहे. ‘किसी गोरे ने मुझसे कहा था कि हिदुस्तान में सिर्फ डरपोक पैदा होते है. ये वक्त जवाब देने का है,’ या संवादाने ट्रेलरची सुरुवात होते.या चित्रपटात अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे.हा चित्रपट एक युद्धपट असून चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत आहे.

या चित्रपटात अक्षय कुमारने ईशर सिंगची भूमिका साकारली आहे .चित्रपटातील अक्षयचे दमदार डायलॉग विशेषतः ‘मेरी पगडी भी केसरी और जो लहू बहेगा वो भी केसरी’ अंगावर शहरे आणणारे आहे. ‘केसरी’ चित्रपटातून २१ सैनिकांची अविश्वसनीय शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या सारागढीच्या युद्धात भारतीय सेनेच्या २१ शीख सैनिकांनी १० हजार अफगाणी सैनिकांना सळो की पळो करुन सोडले होते.

आज सकाळी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे .काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने या चित्रपटाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती.अनुराग सिंगने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मीती आहे. चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा दिसणार आहे. २१ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.