Keshav Upadhye | उद्धव ठाकरेंच्या राजकारणात रामाच्या जागेवर राहुल!, भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची टीका (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक नेत्याला मातोश्रीवर येण्यासाठी भाग पाडणारा बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) आदरयुक्त दबदबा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) रसातळाला पोहोचवला आहे. पक्ष, संघटना किंवा कार्यकर्त्यांसाठी कधीही घराबाहेर न पडलेले उद्धव ठाकरे आता राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) बोलत होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नूतन अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यावेळी उपस्थित होते.

केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले की, या आधी भाजपसोबत (BJP) युती असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे कधी रस्त्यावर उतरले नाहीत. लालकृष्ण अडवाणी (LK Advani), मुरली मनोहर जोशींच्या (Murali Manohar Joshi) रथयात्रांत तर उद्धव ठाकरे फिरकले देखील नाहीत. हात उंचावून जाहीर सभांमध्ये हिंदुत्वाच्या पोकळ गर्जना करणारे उद्धव ठाकरे बाबरी प्रकरणाच्या (Babri Case) वेळी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवून घरात टीव्ही बघत होते, तर तीन वर्षांपूर्वीच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झाले नव्हते.

‘मुंह मे राम, बगल मे राहुल’ ही म्हण उद्धव ठाकरे यांच्यासाठीच शब्दशः तयार झाली असावी असा टोला हाणून ते
म्हणाले, यांना रामाची नाही, तर राहुलची आरती आवडू लागली आहे. राहुल गांधींच्या पदयात्रेस हजर राहुन
उद्धव ठाकरे आपल्या काँग्रेसनिष्ठेचा नजराणा सोनिया गांधींना (Sonia Gandhi) देणार आहेत का,
असा सवालही त्यांनी केला.

Web Title :- Keshav Upadhye | Rahul instead of Rama in Uddhav Thackeray’s politics!, BJP Chief Spokesperson Keshav Upadhyay criticizes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा