Ketaki Chitale | अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी; ताब्यासाठी गोरेगाव पोलिसांनी अर्ज केल्यानं केतकीच्या अडचणीत वाढ
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ketaki Chitale | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर अर्वाच्य शब्दात टीका केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) अडचणीत सापडली आहे. केतकीने शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबूकवर शेअर केल्याने तिला अटक (Arrested) झाली होती. आज केतकीला न्यायालयात हजर केले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (14 Days Judicial Custody) सुनावली आहे. (Ketaki Chitale Controversial Facebook Posts)
शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि आपत्तीजनक शब्दात पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस कोठडीमध्ये असणाऱ्या केतकी चितळेला (Ketaki Chitale) आज ठाणे सत्र न्यायालयात (Thane Sessions Court) हजर करण्यात आले होते. यापुर्वी तिने पोस्ट डिलीट करणार नसल्याचं कोर्टात सांगितलं होतं. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीपण्णी केल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते (NCP Activists) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर तिच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, त्यानंतर केतकी चितळे कडून जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.
केतकी चितळे हिच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिसांत (Goregaon Police) देखील गुन्हा दाखल झाला आहे.
त्यामुळे केतकी चितळे हिचा ताबा मिळावा यासाठी आज गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे.
हे सर्व पाहता केतकी चितळेच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update