KGF Chapter 2 Release Date | ’केजीएफ 2’ची प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी रिलिज होईल चित्रपट; जाणून घ्या नवीन तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था KGF Chapter 2 Release Date | कन्नड चित्रपट (Kannada film) केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2 Release Date) मोठ्या कालावधीपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक अतुरतेने वाट पहात आहेत. केजीएफ चॅप्टर 2 यावर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता होती, परंतु कोरोना व्हायरस महामारी (corona virus epidemic) मुळे प्रदर्शन रद्द करावे लागले होते. यानंतर केजीएफ चॅप्टर 2 च्या प्रदर्शनाच्या तारखेची प्रेक्षक अतुरतेने वाट पहात होते.

Advt.

परंतु, रक्षाबंधन (Rakshabandhan) च्या विशेष निमित्ताने आता केजीएफ चॅप्टर 2 ची नवीन पदर्शनाची तारीख (new release date) घोषित करण्यात आली आहे. या चित्रपटात बॉलीवुड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) दिसणार आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने संजय दत्तने केजीएफ चॅप्टर 2 च्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे.

 

 

 

संजय दत्त (Sanjay Dutt) ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर केजीएफ चॅप्टर 2 चे पोस्टर शेयर केले आहे. केजीएफ चॅप्टर 2 पुढील वर्षी 14 एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल (KGF Chapter 2 will be released in theaters on April 14 next year).

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

या पोस्टमध्ये चित्रपटातील सर्व कलाकार दिसत आहेत. संजय दत्तने कॅपशनमध्ये केजीएफ चॅप्टर 2 ची प्रदर्शनाची तारीख लिहिली आहे. त्याने कॅपशनमध्ये लिहिले आहे की, आजची अनिश्चितता केवळ आपल्या संकल्पाला उशीर करू शकते, परंतु जसे आश्वासन दिले होते, तसेच होईल. आम्ही 14 एप्रिल 2022 ला चित्रपटगृहांमध्ये उतरणार आहोत. संजूबाबाची ही पोस्ट वायरल होत आहे.

चित्रपटाची प्रतिक्षा करत असलेले प्रेक्षक या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
हा चित्रपट मूळ कन्नड भाषेत आहे, परंतु हिंदी प्रेक्षकांमध्ये सुद्धा चित्रपटाची जबरदस्त उत्सुकता आहे.
चित्रपटाच्या सर्व दक्षिण भाषा कन्नड़, तेलुगु, तमिळ आणि मल्याळमच्या वर्ल्डवाईड सॅटेलाईटचे अधिकार झी ग्रुपने मिळवले आहेत.
चित्रपटाचा मुख्य अभिनेता यशने याबाबत माहिती दिली आहे.

Web Title : KGF Chapter 2 Release Date | kgf 2 new release date has been announced starrer yash and sanjay dutt film will release on 14-april 2022

 

Health Care Tips | चहा पिताना कधीही करू नका 4 चूका, अन्यथा ‘या’ आजारांना पडू शकता बळी; जाणून घ्या

Payment Aggregators | डेबिट, क्रेडिट कार्ड नंबरसह एक्स्पायरी आणि CVV सुद्धा आता ठेवावा लागेल लक्षात; RBI करतंय मोठा बदल; जाणून घ्या

Malicious Apps | सावधान ! तात्काळ आपल्या फोनमधून DELETE करा ‘हे’ 8 अ‍ॅप, Google ने केले बॅन; जाणून घ्या लिस्ट