उच्चशिक्षित वाहनचोराला खडक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहर व परिसरातील वाहने चोरणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाला खडक पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकिस आणले आहेत. त्याच्याकडून चार दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.

गौरव राजकुमार शर्मा (३०, कोंढवा बु. मुळ उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

खडक पोलिस ठाण्यात दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील कर्मचारी फहिम सय्यद व आशिष चव्हाण यांना माहिती मिळाली की, गौरव शर्मा नावाचा तरुण वाहन चोरी करतो. त्याअनुषंगाने त्याला पथकाने ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे केलेल्या तपासात सात गुन्हे उघडकिस आणण्यात आले. त्याच्याकडून खडक २, वानवडी ३, भोसरी १ व पौड १ या पोलीस ठाण्यात दाखल सात गुन्हे उघडकिस आणले.

गौरव शर्मा हा उच्चशिक्षित असून रात्रीच्यावेळी वाहने चोरून त्यांचे सुटे भाग करून विक्री करत होता. तो एका बर्गर विक्रीच्या मोठ्या मॉलमध्ये नोकरीस आहे.

त्याच्यावर यापुर्वी चतुश्रृंगी वाकड, पोलीस ठाण्यातही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक उत्तम चक्के, सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, कर्मचारी विठ्ठल पाटील, विनोद जाधव, फईम सय्यद, गौरी राजगूरू, संदिप पाटील, आशिष चव्हाण, प्रमोद नेवसे, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राकेश क्षीरसागर, रवि लोखंडे, इम्रान नदाफ, महावीर दावणे, योगेश जाधव, विशाल चव्हाण, हिम्मत होळकर, सोमनाथ ढगे यांच्या पथकाने केली.

ह्याहि बातम्या वाचा

?लोकसभा 2019 : विखे घराण्याचा बंडखोरीचा ‘रेकाॅर्ड ब्रेक’

?ऑपरेशन ‘नगर’ सक्सेसनंतर आता भाजपचे ऑपरेशन ‘माढा’

?दिल्लीच्या सर्व जागा काँग्रेस शिवाय जिंकू : अरविंद केजरीवाल

?रोहित पवारांचा पार्थ पवारांना सल्ला

?’काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते काही काळात भाजपमध्ये असतील’

?शिरुर लोकसभा मतदरासंघ : कोल्हेमुळे आढळरावांचा विजयाचा मार्ग खडतर