पुणेकरांसाठी खुशखबर ! खडकवासला धरण १०० टक्के भरलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाने अनेक भागात चांगला जोर धरला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातही गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. खडकवासला धरण भरल्यानंतर आता मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. या पाण्याच्या विसर्गानंतर नदीकाठी असलेल्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

मुसळधार सततच्या पावसाने खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. यानंतर मध्यरात्री दोन वाजल्यापासून मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यानंतर नदीकाठच्या ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. कारण मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलेल्या पाण्याचा वेग १७०० क्युसेक इतका आहे.

पुरेसा जलसाठा झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. कारण असे अनेक ठिकाणं आहेत जिथे कमी प्रमाणात पाऊस झाला आहे आणि तेथील धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. पिंपळगाव, जोगे, घोड आणि नाझरे या धरण क्षेत्रात खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे खकडकवासला धरण पूर्ण भरल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आणखी दिलासादायक बाब अशी की, केवळ खडकवासलाच नाही तर, पुण्यातील कळमोडी धरणही शंभर टक्के भरले आहे.

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या