Khadakwasla Dam Pune | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Khadakwasla Dam Pune | शहराबरोबरच धरणांच्या परिसरात सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणारे पाणी शुक्रवारी थांबविण्यात आले. शहराला पाणीपुरवठा करणाऱया धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची पुढील वर्षभराची पाण्याची काळजी मिटली आहे. (Khadakwasla Dam Pune)

 

यंदा हंगामात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर जून महिना कोरडाच गेला. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धरणांच्या परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे खडकवासला हे धरण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातच भरले. त्यानंतर पानशेत, वरसगाव आणि पाठोपाठ टेमघर धरणही पूर्ण क्षमतेने भरले. १२ सप्टेंबरपासून धरणांच्या परिसरात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने चारही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या पाऊस थांबल्याने केवळ टेमघर धरणातून वीजनिर्मितीसाठी २७० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. (Khadakwasla Dam Pune)

 

दरम्यान, जिल्ह्यातील इतर धरणांच्या परिसरातही पाऊस ओसरला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे १०० टक्के भरली आहेत. सध्या पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, आंद्रा, कासारसाई, वीर, नाझरे आणि उजनी या धरणांमधून सध्या कमी-अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाने सांगितले.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो.
सध्या चारही धरणांत मिळून एकूण २९.१५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंत १७१२ क्युसेक वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत होते.
मात्र, धरणांच्या परिसरात पाऊस थांबल्याने वरसगाव आणि पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला.
त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीतील विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

 

Web Title :- Khadakwasla Dam Pune | The release of water from Khadakwasla Dam was stopped

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | विश्वास संपादन करुन 22 लाख रुपये चोरुन नेणार्‍या महाराजाला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Dasara Melava 2022  | शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’, भाजपने उडवली उद्धव ठाकरे यांची खिल्ली

Pune News | धक्कादायक ! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी (व्हिडिओ)