खडसेंच्या कार्यकर्त्यांनी विचारला दानवेंना जाब 

भुसावळ (जळगाव) : पोलीसनामा आॅनलाईन –  एकनाथ खडसे यांचा मंत्रीमंडळात सहभाग कधी करणार? हा प्रश्न विचारत संतप्त कार्यकर्त्यांनी  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांना जाब आज विचारला आहे. रावसाहेब दानवे हे पक्षाच्या आढावा बैठकीला भुसावळ या ठिकाणी आलेअसता हा प्रकार घडला आहे. भुसावळ येथील आय. एम. ए. हॉल येथे शनिवारी(आज) दुपारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन केले होते. तेव्हा कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ  सहभागाबद्दल आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. एकनाथ खडसे यांचे होत असलेले राजकीय पतन त्यांच्या कार्यकर्त्यांना पाहवत नाही आणि त्यांच्या प्रेमातून आणि खडसेंवर होत असलेल्या राजकीय अन्यायाच्या रागातून  दानवे यांना कार्यकर्त्यांनी धारेवर धरले होते. एकंदरच आज भुसावळमध्ये  भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आणि अकार्यकर्त्यांच्या मध्ये नाट्यमय हालचाली घडत असल्याचे पहावयास मिळाले.

दानवेंनी दिले खडसेंच्या मंत्रिमंडळ सहभागाचे आश्वासन
रावसाहेब दानवे यांना कार्यकर्त्यांनी आक्रमक रित्या मंत्रीमंडळ  सहभागा संदर्भात विचारले असता रावसाहेब दानवे यांनी नाथाभाऊंचा मंत्रिमंडळात सहभाग होणार आहे असे कार्यकर्त्यांना सांगीतले. नाशिकच्या कार्यकर्त्यांनी हाच प्रश्न मागील काही दिवसांपूर्वी विचारला असता तेव्हा हि मी हेच उत्तर दिले कि नाथाभाऊंचा मंत्रीमंडळ विस्तारात सहभाग केला जाणार आहे असे रावसाहेब दानवे म्हणाले

दानवेंनी सांगितल्या खिडक्या लावण्यास 
खडसेंच्या मंत्रीमंडळ सहभागावरून आक्रमक झालेले कार्यकर्ते काही केल्या शांत होण्याचे नाव घेत नव्हते. बैठक बंद हॉल मध्ये असल्याने आत कसला गोंधळ चालू आहे या बद्दल बाहेर चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना खिडक्या बंद करण्यास सांगितले जेणेकरून आतील आवाज बाहेर जाणार नाही .

खडसेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे केले आवाहन
एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागा बद्दल आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्या करता शेवटी खडसे उठून उभे राहिले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले . रावसाहेब दानवे हे आपल्याला पक्षाचा निर्णय कळवतील.दानवेंवर आपला पूर्ण विश्वास  आहे असे खडसे म्हणाले आणि त्यांनी  कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले . त्यांच्या नंतर कार्यकर्ते शांत झाले.परंतु बैठकीला अशांततेचे गालबोट मात्र नक्की लागले.