Raghunath Khandalkar | खंडाळकर गुरूजींचा षष्टब्दीपूर्ती सोहळा संपन्न

स्वरचित चालींमुळे खंडाळकर यांची भजने मनाच्या तळाची ठाव घेणारी - भगवानगड महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव शास्त्री

पुणे : Raghunath Khandalkar | मानवी मनाच्या तळाचा ठाव घेत चित्त समाधानाचा आनंद केवळ पंडित रघुनाथ खंडाळकर (Raghunath Khandalkar) यांच्या भजनांमध्ये असून स्वरचित चालींमुळे ती वैशिष्ट्यपूर्ण ठरली असल्याची भावना भगवानगडाचे महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांनी व्यक्त केली.

अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्या षष्टब्दीपूर्ती निमित्त कात्रज येथील आरोह गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यभर पसरलेल्या पं. रघुनाथ खंडाळकर (Raghunath Khandalkar) यांच्या शिष्य परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. पं. शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, पं. अजय पोहनकर, पं. विकास कशाळकर, पं. अतुल कुमार उपाध्ये, उद्योजक नानासाहेब मारणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नामदेव शास्त्री पुढे म्हणाले, शास्त्रीय गायनातून पारंपरिक वारकरी संगीत भजनातून सादर करणाऱ्या पं. रघुनाथ खंडाळकर यांच्या गुणवैशिष्ट्यांची व प्रतिकूल काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पांडुरंग भक्तांना खंडाळकर यांच्या भजनांनी निखळ आत्मिक आनंद दिला आहे, असे त्यांनी म्हटले.

याप्रसंगी खंडाळकर गुरुजींचे आई वडील हरिभाऊ व वत्सला खंडाळकर यांचाही सन्मान करण्यात आला.

राज्यभरातून आलेल्या शिष्य परिवाराने भव्य स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ, मानपत्र देऊन खंडाळकर गुरुजींचा यथोचित सन्मान केला.

डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांनी याप्रसंगी गुरुजींची प्रकट मुलाखत घेत त्यांच्या पाच दशकांच्या सांगितिक कार्याचा वेध घेतला.

गुरुजींच्या निवडक चालींवर आधारित गीते त्यांच्या शिष्य परिवारांनी यावेळी सादर केली.

याप्रसंगी गुरूजींच्या कार्यावर आधारित ‘भजनानंद’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरंजन खंडाळकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय बोत्रे पाटील यांनी केले. तर लहू लोहकरे यांनी आभार मानले.

Web Title :  Khandalkar Guruji’s 60th birthday celebration; Khandalkar’s bhajans are deeply moving due to vocal movements. Bhagwangad Mahant Nyayacharya Dr. Namdev Shastri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

1920 Horrors Of The Heart Trailer Out | ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; छोट्या पडद्यावरील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Raigad Shivrajyabhishek Sohala | किल्ले रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज, सोहळा अर्ध्यात सोडून माघारी

Richest Indian Actress | ‘या’ अभिनेत्री आहेत देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, कोट्यावधी रूपयांच्या मालकीण