‘ये बात’ ! कलेक्टर मॅडमची १४ महिन्याची मुलगी शिक्षणासाठी चक्‍क ‘अंगणवाडीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल अगदी सर्वसामान्य लोकांना देखील आपल्या पाल्याला सरकारी शाळेत न घालता खाजगी शाळांमध्ये घालायचे असते. आपल्या आजूबाजूला अनेकजण शिक्षणाविषयी आणि शैक्षणिक दर्जाविषयी बोलत असतात पण त्यांची कृती याच्या विरोधात असते. मात्र मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशा सर्व लोकांसाठी एक आदर्श उभा केला आहे. त्यांनी आपल्या १४ महिन्यांच्या मुलीला अंगणवाडीमध्ये घातले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे पहिले प्रकरण आहे. ज्यामध्ये एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने आपल्या पाल्याला अंगणवाडीमध्ये शिकण्यासाठी पाठवले आहे.

या महिला जिल्हाधिकाऱ्यांचे नाव तन्वी सुंद्रियाल असे आहे. त्यांचेदेखील पती डॉ. पंकज जैन हे देखील आयएएस असून ते भोपाळच्या नगर प्रशासन विभागात अप्पर आयुक्त आहेत. तन्वी यांनी आपली मुलगी पंखुड़ी हिचा अंगणवाडीत प्रवेश करताना व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी असे सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी जेव्हा आपल्या पाल्याला शाळापूर्व प्रशिक्षणासाठी शाळेत दाखल करण्याचा विचार झाला तेव्हा कसलाही विचार न करता या दाम्पत्याने आपली मुलगी पंखुडी हिला कटनी येथील अंगणवाडीच्या शाळेत प्रवेश घेऊन दिला होता. आई आणि वडील दोघेही भारतीय प्रशासन सेवेत काम करत असताना मुलगी कोणत्याही मोठ्या आणि महागड्या शाळेत न शिकता अंगणवाडीच्या सर्वसाधारण शाळेत शिकत आहे हि गोष्ट समाजासाठी निश्चितच आदर्शवत अशी आहे.

या दाम्पत्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे. या घटनेची विशेष दखल घेत मध्यप्रदेश च्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी पत्र लिहून जिल्हाधिकारी तन्वी यांच्या या निर्णयाचे कौतुक केले.

आरोग्यविषयक वृत्त – 

दुर्लक्ष करू नका, ‘सायलेन्ट हार्ट अटॅक’ची लक्षणे जाणून घ्या

नकळत होणाऱ्या ‘ह्या’ वेदनांकडे दुर्लक्ष करणे बेतू शकते ‘जीवावर’

माणसाच्या पोटात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण जाण्याचे प्रमाण चिंताजनक

गॅस, अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी करा ‘ही’ एक्सरसाइज ; मिळेल आराम