Khavis Marathi Movie Poster Released | खविस चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

पुणे : खविस या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर (Khavis Marathi Movie Poster Released) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाचे निर्माते अमोल घोडके व श्रीनिवास कुलकर्णी असून चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत घाडगे यांनी केले आहे. चित्रपटांत कोणते कलाकार आहेत याबद्दल आणखी माहिती समोर आलेली नाही. अनिकेत घाडगे यांनी यापूर्वी कॉलेज डायरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अतिशय डार्क पद्धतीने तो चित्रपट मांडला होता. (Khavis Marathi Movie Poster Released)

चित्रपटाच्या पोस्टरवर कवटी, काळी बाहुली, हळद कंकू लावलेले लिंबू दिसत असून पोस्टरवरून चित्रपट गूढ, रहस्यमय वाटतो.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्टर प्रदर्शित करताना सांगितले की, “खविस हा एक वेगळा आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारा चित्रपट असेल. कोकणात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून चित्रपटाच्या कथेवर आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.”

चित्रपटाची कथा काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोस्टरवरून
चित्रपटात काहीतरी गूढ आणि रहस्यमय असल्याचे दिसून येते.
चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील एका गावात सुरू सुरु असून लवकरच
चित्रपट रसिकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे निर्माते सांगतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या मंगेश तांबे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 107 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

अपघातानंतर पळून गेल्यास १० वर्ष शिक्षा; राज्यात ठिकठिकाणी ट्रक चालक उतरले रस्त्यावर