Khed-Shivapur Tolanaka | खेड-शिवापूर टोलनाका बंद होणार नाही – NHAI संचालकाची माहिती

खेड-शिवापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Khed-Shivapur Tolanaka | केंदीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुणे येथे एका कार्यक्रमादरम्यान मोठं विधान केलं आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील टोल (Khed-Shivapur Tolanaka) बंद करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले होते. मात्र लोकांच्यात याबाबत सभ्रंम निर्माण झाला होता. टोल बंद कधीपासून असे सवाल उपस्थित होत होते. या मुद्यावरुन मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक सुहास चिटणीस (Suhas Chitnis) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

सुहास चिटणीस (Suhas Chitnis) यांनी अशी माहिती दिली आहे की, पुणे-सातारा रस्त्यावरील (Pune-Satara Highway) खेड-शिवापूर टोलनाका
(Khed-Shivapur Tolanaka) हा बंद होणार नाही तर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा टोलनाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) रिलायन्स इन्फ्राकडून स्वतःच्या ताब्यात घेणार आहे.
अर्थात या कालावधीत कंत्राटदाराला टोलचे पैसे मिळणार नाहीत, असे ते म्हणाले.
याचा अर्थ म्हणजे हा टोलनाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे (NHAI) हस्तांतरीत होणार आहे.

टोल नाका स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) स्वतःच्या ताब्यात घेणार आहे.
या कालावधीत कंत्राटदाराला म्हणजेच रिलायन्स इन्फ्राला टोलचे पैसे मिळणार नाहीत.
पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाका ‘NHAI’ च्या ताब्यात असणार आहे.
तर, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टोलनाका रिलायन्स इन्फ्राकडे देण्यात येईल.
तसेच रस्त्याच्या कामासाठी खर्च झालेली रक्कम रिलायन्स इन्फ्राकडून वसूल करण्यात येईल.
टोलनाका ‘NHAI ‘ कडे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं देखील सुहास चिटणीस यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Khed-Shivapur Tolanaka | Khed-Shivapur Tolanaka will not be closed – NHAI Director Information

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Municipal Elections | मंत्री बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, म्हणाले – ‘महापालिका 3 सदस्यीय प्रभागाचा बुधवारी फेरविचार’

SSC Selection Post Phase 9 2021 | सरकारी नोकरीचा शोध संपणार, एसएससीने 3261 पदांसाठी काढली ‘व्हॅकन्सी’

Actress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा शेट्टीने घेतला सुटकेचा श्वास