Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापुर टोलनाक्यावर २ एप्रिलला सर्वपक्षीय एल्गार; सर्व मार्ग अवलंबून झाले आता टोलनाक्याच्या अंत्यविधी करणार – कृती समिती

पुणे : Khed Shivapur Toll Plaza | राष्ट्रीय महामार्ग क्र .४ वरील खेड शिवापूर टोलनाक्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व टोल प्रशासनाकडून स्थानिकांची टोलसाठी होणारी सक्ती आणि मुजोरी याविरोधात शिवापुर टोलनाका हटाव कृती समिती आणि विविध पक्षांकडून आतापर्यंत अनेक आंदोलनं केली गेली त्या त्या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व टोल प्रशासनाने दिलेली आश्वासने काही दिवसातच स्वतःच मोडीत काढली असून सध्या स्थानिकांना टोल भरा अन्यथा पास काढा अशी सक्ती करण्यात येत आहे त्याविरोधात शिवापुर टोलनाका हटाव कृती समिती आणि विविध पक्षांची बैठक नुकतीच केळवडे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन २ एप्रिलला शिवापुर टोलनाक्यावर सर्वपक्षीय आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. (Khed Shivapur Toll Plaza)

टोलनाक्यावर सुरू असलेल्या सक्तीच्या टोलवसुली बाबत नागरीकांमधे संतप्त भावना निर्माण झाली असुन टोलनाक्याच्या स्थलांतराचा मुद्दा जाणीवपुर्वक बाजुला ठेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) सक्तीने टोलवसुली करीत आहे अशी भावना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली.यावेळी प्रत्येक पक्षाच्या तालुका निहाय आंदोलन समितीची स्थापना करण्यात आली. सर्वपक्षीय मेळावे भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांमधे घेण्यात येणार असुन काँग्रेस,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे),भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, किसान मोर्चा या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्या विरूद्ध एल्गार पुकारला आहे . यावेळी टोलनाक्यावर आरेरावी करणाऱ्या नाना कोंडे या व्यक्ती विरूद्ध कृती समितीच्या सदस्यांनी राजगड पोलीस स्टेशन (Rajgad Police Station) मधे जाऊन तक्रार दिली. (Khed Shivapur Toll Plaza)

या बैठकीला काँग्रेस पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष शैलेशदादा सोनवणे ,भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड,भोर पंचायत समितीचे माजी सभापती लहुनाना शेलार,भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जिवन कोंडे,शिवसेना भोर तालुकाप्रमुख माऊली शिंदे ,युवासेना भोर तालुकाप्रमुख आदित्य बोरगे,माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलदादा आवाळे,शिवसेना वेल्हे तालुकाप्रमुख दिपक दामगुडे, राष्ट्रवादी उपतालुका प्रमुख भरत किन्हाळे, भोर तालुका राष्ट्रशक्ती संघटनेचे रामभाऊ मांढरे,शिवापुर टोलनाका हटाव कृती समितीचे संघटक गोरख मानकर,समन्वयक शुभम यादव, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अरविंद सोंडकर, भोर तालुका किसान मोर्चाचे दादा पवार, दादा आंबवले आदी उपस्थित होते.

“शिवापुर टोलनाका स्थलांतरीत करण्याची मागणी जनतेतून व लोकप्रतिनिधींकडून होत असुनही
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व टोल प्रशासन मुजोरी करीत आहे.
यापुर्वी केलेल्या आंदोलनामधे टोल प्रशासनाने दिलेला शब्द फिरवला आहे.
आता टोलनाक्याचा अंतिम लढा २ एप्रिल रोजी टोलनाक्यावर दिला जाईल.
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गावागावात जाउन आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन कृतीसमितीचे
निमंत्रक माउली दारवटकर यांनी केले आहे.

कृती समितीचे सदस्य डाॅ. संजय जगताप यांनी आपण आधी भुमीपुत्र आहोत नंतर पक्षाचे पदाधिकारी आहोत.
ही लढाई श्रेयवाद किंवा पक्षभेदात अडकून रहाता कामा नये अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

Web Title :- Khed Shivapur Toll Plaza | All-Party Elgar on Khed-Shivapur tollbooth on April 2; All the ways depended, now toll nakaya’s funeral will be done – action committee

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीसांना एक कोटी लाच देण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितला घटनाक्रम (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट