Khupte Tithe Gupte | ‘खुपते तिथे गुप्ते’ शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार शेवटचा एपिसोड

पोलीसनामा ऑनलाइन – Khupte Tithe Gupte | मागील काही दिवसांपासून झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा शो जबरदस्त लोकप्रिय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे हे दुसरे पर्व होते. राजकीय व्यक्ती, कलाकार आणि सेलिब्रिटी यांना हटके प्रश्न विचारत अवधूत गुप्ते यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. मात्र आता लवकरच ‘खुपते तिथे गुप्ते’ शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अवधुत गुप्तेंनी ही माहिती शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (Khupte Tithe Gupte)

या वर्षी जून महिन्यापासून ‘खुपते तिथे गुप्ते’ या चॅट शोचे दुसरे पर्व 10 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस आले. दशकानंतर हा चॅट शो परतल्यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता होती. मात्र या पर्वांने लवकर समाप्ती घेतली असून ‘खुपते तिथे गुप्ते’ पर्व 2 चा शेवट होत असल्याचे जाहीर केले आहे. अवधुतने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अवधूत गुप्ते शेवटचा मेकअप करताना दिसत असून रंगमंचावर नारळ फोडताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये अवधूतने लिहिले आहे की, ‘थोडे विसरावे लागते… आठवण्यासाठी..दूर जावे लागते पुन्हा भेटण्यासाठी! ह्या पर्वाचा शेवटचा भाग.. येत्या रविवारी!!’ असे कॅप्शन दिले आहे. (Khupte Tithe Gupte)

अवधूत गुप्तेच्या या पोस्टमुळे ‘खुपते तिथे गुप्ते’ पर्व 2 चा शेवट होणार असून येत्या रविवारी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचा शेवटचा भाग असणार आहे. येत्या रविवारी राजकारणी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. अनेकांना हा शेवटचा एपिसोड आहे हे कळताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘इतक्या लवकर हे पर्व का संपणार? कधी एकदा रविवार येतोय आणि खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम पाहायला मिळतोय याची उत्सुकता असायची. जेव्हा तीसरे पर्व सुरू होणार हे कळलं तेव्हा प्रचंड आनंद झाला. हे पर्व इतक्या लवकर संपेल अस अजिबातच वाटलं नव्हतं. लवकरच पुढील परवसुद्धा येईल अशी आशा आहे’ नेटकऱ्यांनी अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Advt.

झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा चॅट शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे.
दुसऱ्या पर्वामध्ये कार्यक्रमातील खुर्ची ही खास लक्षवेधी ठरली होती. या हटके खुर्चीवर बसून अनेकांची उलट तपासणी अवधूत गुप्ते यांनी घेतली असून मजामस्ती देखील केली आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये राज ठाकरे, संजय राऊत, अभिजीत बिचुकले, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे या राजकारण्यांनी हजेरी लावली होती. तसेच अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी ही कलाकार मंडळी देखील शोमध्ये सहभागी झाली होती. आता मात्र ‘खुपते तिथे गुप्ते’ शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Marathwada Cabinet Meeting | मुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेत खोचक सवाल, म्हणाले –
‘राऊत आले नाहीत का?’

Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports | शेतकरी आत्महत्यांबद्दल
केंद्रेकर यांच्या अहवालावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘त्यांची सामिती…’

Ganeshotsav 2023 | मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन –
पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers | अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावले खडेबोल,
कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची, मंत्रिपदे नुसती…