Marathwada Cabinet Meeting | मुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेत खोचक सवाल, म्हणाले – ‘राऊत आले नाहीत का?’

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Marathwada Cabinet Meeting | छत्रपती संभाजी नगरमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सरकारने कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी केली, जेवणाचे १५०० रूपयांचे एक शाही ताट, सर्व पंचतारांकित हॉटेल्स बुक केलीत असे आरोप विरोधकांनी काल केले होते. याबाबत जाब विचारण्यासाठी मी पत्रकार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार आहे, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी दिला होता. यावरूनच आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वरील खोचक सवाल केला. (Marathwada Cabinet Meeting)

काय म्हणाले होते संजय राऊत

संजय राऊत म्हणाले होते, मंत्रिमंडळ बैठकीसाठी कलेक्टरने शहरातील सर्व हॉटेल बुक केली आहेत. कोणासाठी खर्च केला याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. शनिवारी मंत्रिमंडळ बैठक आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. त्याला एक पत्रकार म्हणून मी जाणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात पैसे उधळले जात आहेत, याचा हिशेब सरकारला द्यावा लागेल. राऊतांच्या इशाऱ्यानंतर ते खरंच मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाऊन जाब विचारणार का? अशी चर्चा दिवसभर रंगली होती. (Marathwada Cabinet Meeting)

दरम्यान, आज राज्य मंत्रिमडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी, राऊत आले नाहीत का? असा खोचक सवाल पत्रकारांना विचारताच उपस्थितांनी हसून दाद दिली. यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे यांनी दुसऱ्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या राऊत नावाच्या पत्रकाराचा उल्लेख करत आपण त्यांच्याबद्दल विचारत असल्याचे म्हटले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेसाठी खासदार संजय राऊत यांना देखील पास देण्यात आल्याची माहिती
पोलिसांनी दिली होती. त्यामुळे संजय राऊत हे खरंच मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports | शेतकरी आत्महत्यांबद्दल
केंद्रेकर यांच्या अहवालावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘त्यांची सामिती…’

Ganeshotsav 2023 | मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन –
पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers | अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावले खडेबोल,
कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची, मंत्रिपदे नुसती…