अभिनेत्री कियारा आडवाणीचं सोनम कपूरच्या भावासोबत ‘लफडं’ सलमान खानसोबत ‘हे’ कनेक्शन !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चित्रपट ‘फुगली’ (२०१४) पासून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी कियारा आडवाणी आज एक मोठे नाव आहे. चित्रपट कबीर सिंगपासून तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. कियाराने खूप कमी वेळात बॉलीवूडमध्ये आपले नाव कमवले. आज (३१ जुलैला ) कियारा आपला वाढदिवस साजरा करत आहे. कबीर सिंगच्या सक्सेस नंतर कियारासाठी बर्थडे खूप खास आहे.

कियारा आडवाणीचे नाव कियारा नव्हतेच. बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या आधी तिचे नाव आलिया आडवाणी होते. परंतु, बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली तर तेव्हा अभिनेत्री आलीय भट्ट एक मोठे नाव झाले होते आणि त्यामुळे तिने आपले नाव बदलून कियारा ठेवले. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे नाव तिला बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने दिले आहे.

सलमान खानचे कियाराच्या परिवारासोबत खास कनेक्शन आहे. कियाराने एका इंटरव्यू मध्ये सांगितले की, मेरी मां सलमान सर को जानतीं थी क्योंकि दोनों ही बांद्रा में पले बढ़े हैं. वो अक्सर मेरी मां को कहा करते थे कि वे भविष्य में स्टार जरूर बनेंगे. दोनों अच्छे दोस्त हैं और साथ में साइकिल भी चलाते थे.’ सलमान खानने कियाराची मावशी शाहीन जाफरीला देखील डेट केले आहे.

शाहीन जाफरी, सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड होती. कियाराने एक इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, ‘मां ने सलमान सर को शाहीन मौसी से इंट्रो कराया था और दोनों ने कुछ समय के लिए एक दूसरे को डेट भी किया था. मेरे ख्याल से ये दोनों का शायद पहला रिलेशनशिप रहा होगा.’ शाहीन जाफरी लेजेंडरी अभिनेता अशोक कुमारची नात आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कियारा आडवाणीने सोनम कपूरचा कजिन आणि फुगली को-स्टार मोहित मारवाहला देखील डेट केले आहे. दोघांच्या लिंकअप होण्याच्या चर्चा दीर्घकाळ सुरु होत्या.

आरोग्यविषयक वृत्त