Kiara Advani | कियारा अडवाणी गेली वाघा बॉर्डरवर; तिरंगा फडकवताना व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) ही नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. कियाराचा चाहता वर्ग देखील मोठा असून तिच्या चाहत्यांना तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. काही दिवसांपूर्वी कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट (Satyaprem Ki Katha Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. अभिनेत्री कियारा व अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली असून चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. कियारा अडवाणी (Kiara Advani) हिचा सध्या हातात तिरंगा घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी ही प्रसिद्ध अशा ‘वाघा बॉर्डर’वर (Kiara At Wagha Border) गेली होती. यावेळी तिने हातात तिरंगा घेऊन फडकवतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री कियाराने (Kiara Advani) यावेळी सुंदर डिझायनर ड्रेस परिधान केला आहे. या ट्रेडिशनल ड्रेस सुटमध्ये कियाराचे सौंदर्य खुलले असून तिने केस मोकळे सोडले आहे. तिने वाघा बॉर्डरवर हातात तिरंगा घेतला असून तो ती आनंदाने फडकवताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना तो आवडत आहे. अनेकांनी कियाराचे कौतुक करत तिला कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, “शेरशाह खुश झाला आहे” तर दुसर्‍याने लिहिले की “तुझ्या साधेपणाने आणि देशभक्तीने मन प्रसन्न झाले आहे.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Late MLA Mukta Tilak | आमदार स्व.मुक्ता टिळक यांच्या जयंतीनिमित्त कर्करुग्णांवर मोफत उपचार व तपासणी शिबिराचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन

Pune Police News | हडपसर पोलिसांकडून अल्पवयीन मुलांसाठी मार्गदर्शन शिबीर

Jailer Movie | रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटानिमित्त चेन्नई शहर सजलं; सर्वत्र लागलेत पोस्टर