बहिणीच्या घरातून परत येताना तरूणीचं अपहरण, पोलिसांचा तपास सुरू असतानाच ‘शुभमंगल’ झाल्याचं समजलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अपहरण झाल्याचा बनाव करून कुटुंबिय आणि पोलिसांना कामाला लावलेल्या 22 तरुणीने प्रियकरासोबत पळून जाणून प्रेमविवाह केल्याचे उघडकीस आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या या सैराट कहाणीने मात्र पोलिसांची पुरता दमछाक झाली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, एक 22 वर्षीय तरुणी शेगाव येथे बहिणीकडे गेली होती. शेगावहून परतत असताना तिने अकोट शहरातून आपले अपहरण झाल्याचे बनाव केला. त्यानंतर प्रेमविवाह होईपर्यंत अपहरण कसे झाले, कोण केले आदीबाबत मोबाइलद्वारे संदेश पाठवून तिने कुंटुब व पोलिसांचे लक्ष विचलित करत होती. इकडे कुटुंबियांनी शेगाव पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावर युवतीचे फोटो व्हायर करून शोधण्यासाठी आवाहन केले होते.

अकोटमधून अपहरण झाल्याने अकोट पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तिच्या शोध सुरु केला. मोबाइल लोकेशन, संदेशाची तपासणी, सीडीआर गोळा करण्यासाठी पोलिसांची दमछाक सुरु होती. मोबाइल लोकेशनद्वारे पोलीस युवतीच्या मागावर होते. तेवढ्यात पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात संबधित तरुणीने आपल्या 26 वर्षीय प्रियकरासोबत प्रेमविवाह केल्याची माहिती समोर आली. अकोला-अमरावती-बुलडाणा पोलीस या सैराट कहाणीमधील तरुणीला शोधण्यासाठी जीवाचे रान केले होते.