सोशल मिडीयावरून तरुणीला ‘किडनॅप’ करण्याची धमकी 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – ‘तू माझ्याशी मैत्री करशील का ? मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ?’ असे म्हणून माझे मॅसेज बघितले नाहीस तर किडनॅप करेन अशी धमकी एकाने इन्ट्राग्रामवरून तरुणीला दिल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी २२ वर्षीय तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अनोळखी क्रमाकाच्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तू माझ्याशी मैत्री करशील का?’ मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ?’ असे म्हणून माझे मॅसेज बघितले नाहीस तर किडनॅप करेन अशी धमकी दोन अज्ञात मोबाईल धारकांनी तरुणीला दिली. यावरून घारबलेल्या तरुणीने मोबाईल धारकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. तपास निगडी पोलिस करत आहेत.

इन्स्ट्राग्राम आणि व्हाट्सअप्प हॅक करून छेडछाड
पिंपरी : फोटो चोरुन घेऊन ते अश्लील साईटवर अपलोड करून तरूणीचे इन्स्ट्राग्राम आणि व्हाट्सअप्प मॅसेज हॅक करुन छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी पीडित २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. तर कामील शब्बीर मोहम्मद (३२, रा. नागपूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ जानेवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान घडली. पीडित तरुणीचा फोटो कामील याने चोरुन घेतला. तो फोटो अश्लील साईटवर टाकून ‘आता बघ तुझी कशी वाट लावतो,’ अशी धमकी दिली. पीडित तरुणीचे इन्स्ट्राग्राम आणि व्हाट्सअप्प कॉल हॅक करून त्रास देत छेडछाड केली. तपास वाकड पोलीस करत आहेत.