Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्यांवर हल्ला प्रकरणी शिवसेना नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya Attack Case | शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्या वादामध्ये अखेर दोन दिवसापूर्वी राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) राणा दाम्पत्यांची विचारपूस करण्यासाठी खार पोलिस ठाण्यात (Khar Police Station) गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर सोमय्यांनी वांद्रे पोलिसांत (Bandra Police Station) तक्रार दाखल केली होती. यानंतर आता शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांना मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) अटक (Arrested) केली आहे. (Kirit Somaiya Attack Case)

 

शनिवारी किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात गेले असता त्यावेळी शिवसेना (Shivsena) आक्रमक झाल्याचे दिसले. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत सोमय्यांच्या गाडीवर चपला, बाटल्या फेकल्या होत्या. त्यांच्या गाडीची काच फुटल्याने सोमय्या जखमी झाले होते. त्या गोंधळावेळी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सर्वांच्या समोर होते. आता मुंबई पोलिसांनी महाडेश्वरसह चौंघाना अटक केल्याचे सांगितले आहे.

 

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केल्याची माहिती आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत 4 जणांना अटक (Arrested) केल्याची माहिती खार पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya Attack Case | Shivsena leader and former mayor vishwanath mahadeshwar arrested attack case on kirit somaiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त; साडे तीन लाखांचे 11 पिस्टल जप्त (व्हिडिओ)

 

Pune Land survey | खुशखबर ! आता पुणे जिल्ह्यात जमीन मोजणी अवघ्या 30 मिनिटांत

 

Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह 7 जणांवर कौटुंबिक हिंसाचाराखाली गुन्हा दाखल