Kirit Somaiya Viral Video Threat | ’50 लाख दे नाही तर ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करेल’, भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी

खंडणी मागणाऱ्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची कथित व्हिडिओ क्लिप (Kirit Somaiya Viral Video Threat) समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 50 लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी 385 नुसार नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Kirit Somaiya Viral Video Threat)

सोमय्या यांना धमकी नेमकी कुणी दिली? याचा तपास पोलीस करीत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील कार्य़ालयात एक मेल आला. ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढंच नाही तर आरोपीने सोमय्या यांच्याकडे 50 लाख रुपये खंडणीची मागणी देखील केली. या प्रकारानंतर सोमय्या यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. ऋषीकेश शुक्ला नावाने हा ईमेल आयडी असून त्याद्वारे किरीट सोमय्या यांच्या कार्यालयाच्या ई-मेल अॅड्रेसवर हा ईमेल मिळाला आहे. (Kirit Somaiya Viral Video Threat)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोमय्या यांचा कथित व्हिडिओ समोर आला होता.
अश्लील आणि आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित केल्याबद्दल मराठी वृत्तवाहिनीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून
तीन दिवसांची बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापले असताना आता सोमय्या
यांनाच खंडणीसाठी ईमेल आला आहे. नवघर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून सायबर पोलिसही
तपासाला मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation – Kunbi Caste Certificate | मराठा आरक्षण व मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत विधिज्ञ व अभ्यासकांची तज्ञ समिती स्थापन; सद्यस्थितीत आंदोलन नव्हे तर कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता, आरक्षण परिषदेत बहुतांश तज्ञांचा सूर