मनसेच्या राज्य सरचिटणीसपदी किशोर शिंदे, वसंत मोरे आणि संभूस

पुणेः पाेलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि पुणे जिल्हा संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज शुक्रवारी जाहीर केल्या . त्यात , पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे , माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि हेमंत संभूस यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22baad34-91a9-11e8-9bb3-2dd2105528a3′]
तसेच माजी नगरसेविका सुशिला नेटके यांची मनसेच्या पुणे जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे . मनसे विद्यार्थी सेना अध्यक्षपदी प्रशांत कनोजिया आणि आशीष साबळे यांना नेमण्यात आले आहे . संघटनेतील अन्य पदांवर कैलास दांगट , अनिल राणे , विशाल शिंदे , ऋषी सुतार, संजय भोसले , योगेश खैरे , संतोष पाटील यांच्या नेमणुका झाल्या आहेत . या सर्वांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.