KL राहुलनं उडवली सुनील शेट्टीची मुलगी अथियाची ‘खिल्ली’, सांगितली ‘Expectation Vs Reality’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीची मुलगी अभनेत्री अथिया शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अद्यापही या अफेअरच्या चर्चा थांबण्याच नाव घेत नाही असं दिसतंय. आजपर्यंत दोघांनीही या प्रकरणावर मौन बाळगलं होतं. केएल राहुल यानं अलीकडेच एक इंस्टा स्टोरी शेअर करत या बातमीवर अजून जोर दिला आहे.
केएल राहुल आता आपल्या इंस्टा स्टोरीमुळं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुलनं इंस्टाला बनाना ब्रेडची एक स्टोरी शेअर केली आहे. यात अपेक्षा आणि सत्य यातील फरक सांगण्यात आला आहे. क्रिकेटर राहुलनं या स्टोरीत अथिया शेट्टीलाही टॅग केलं आहे. यावरून असं स्पष्ट होतं की, अथिया शेट्टीनं केएल राहुलसाठी हा ब्रेड तयार केला होता.

राहुलनं अथियाला टॅग करत जळालेल्या ब्रेडचा फोटो शेअर केला आहे. त्यात एका ब्रेडला म्हटलं की, हा तो ब्रेड जो बनायला हवा. आणि दुसऱ्या जळालेल्या ब्रेडला लिहिलंय की, हा तो जो ओवनमध्ये जळाला आहे.

राहुल आणि अथिया यांनी अद्याप नात्याबद्दल काहीही सांगितलेलं नसलं तरी वेळोवेळी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यावरून स्पष्ट होतं की, दोघांमध्ये काही तरी शिजत आहे.

https://www.instagram.com/p/B6mxmdXJC9g/

https://www.instagram.com/p/B4e-pKMJFoY/

https://www.instagram.com/p/B6iG5SDpMFn/

https://www.instagram.com/p/B6gbwzupAZr/

https://www.instagram.com/p/B6t-cZBJXRA/