पंतप्रधान मोदींनी तब्बल १७ तास केली ‘हायटेक’ गुहेत ध्यानधारणा ; पंचतारांकित सुविधा उपलब्ध

केदारनाथ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील गुहेत तब्बल १७ तास ध्यानधारणा केली. ही गुहा कशी आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मोदींनी केलेली ही गुहा हायटेक असून या ठिकाणी पंचतारांकित सुविधा उपलब्ध आहेत. ही गुहा खडक फोडून तयार करण्यात आली असून यामध्ये सर्व सुखसुविधा आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी केदारनाथचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली. त्यानंतर त्यांनी या हायटेक गुन्हेत ध्यानधारणा केली. या गुहेमध्ये शौचालयापासून ते सीसीटीव्हीपर्यंतच्या सर्व अद्यावत सुविधा आहेत. या गुहेला ‘रुद्र गुफा’ असे नाव देण्यात असून ती समुद्र सपाटीपासून १२ हजार किलोमीटर उंचीवर आहे. या ठिकाणी एक खोली आहे यामध्ये बेड आणि अटॅच टॉयलेट आहे.

रुद्र गुफेची उंची १० फूट असल्याने आतमध्ये गुदमरायला होत नाही. तसेच एक खिडकी देखील आहे. त्यामुळे थंड हवा आतमध्ये खेळती राहते. या खिडकीतून केदारनाथचे दर्शन करता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या गुहेत ध्यानसाधणा करणार असल्याने या ठिकाणची विशेष काळजी घेण्यात आली आहे. पाणी, वीज या मूलभूत गरजा या ठिकाणी पुरविण्यात आल्या आहेत. २०१८ मध्ये ही गुहा बांधण्यात आली होती. गुहा बंधल्यानंतर बंद होती. आता ही गुहा भाविकांसाठी खुली करण्यात आली असून गुहा वापरण्यासाठी भाविकांना आगोदर नाव नोंदणी करावी लागणार आहे. एक भाविक कमीत कमी तीन दिवसांची नोंदणी करू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गुहेत बसून ध्यानधारणा केली. त्यामुळे या गुहेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा रमणीय आणि भक्तीमय वातावरणात ध्यानधारणा करणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढेल अशी शक्यता केदारनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांनी वर्तवली आहे.