सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले हैदराबादचे ‘सलीम लाला’, त्यांच्या घराचा ‘पत्ता’ वाचून तुम्हीही व्हाल लोटपोट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या सर्व गरजेच्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करण्यास सुरवात केली. अन्नापासून ते कपड्यांपर्यंत सर्व काही ऑनलाइन उपलब्ध आहे. बाहेर जाण्याचा त्रास संपला आहे, मोबाइल फोनवरून घरबसल्या सर्व सामग्री मिळवता येते. यामुळे कोरोनापासून बचावही करता येतो आणि आपले काम देखील कमी वेळात होते.

जर योग्य पत्ता लिहिला नसेल तर

परंतु, आपण असा विचार कधी केला आहे का? की ऑनलाईन कामात वाढ झाल्यामुळे, जिथे लोकांच्या अडचणी कमी झाल्या आहेत, तिथे काही लोकांवर कामाचे ओझे वाढले आहे. डिलिव्हरी बॉय दिवस-रात्र ड्यूटीवर राहून लोकांच्या वस्तू पोहोचवण्यामध्ये व्यस्त असतात. परंतु अशा परिस्थितीत ऑनलाईन वस्तूंसाठी दिलेला पत्ता चुकीचा असेल किंवा बरोबर लिहिला नसेल तर विचार करा डिलिव्हरी बॉयची समस्या किती प्रमाणात वाढत असेल.

हैदराबाद स्टाईलमध्ये पत्ता

असे आम्ही यासाठी म्हणत आहोत कारण, सोशल मीडियावर एक पत्ता व्हायरल होत आहे, जो वाचल्यानंतर हसू थांबवणे अशक्य आहे. शेवटी हसणे कसे थांबेल, हा पत्ता आहेच इतका विचित्र. या ऑनलाइन पत्त्याचा फोटो @Arunbothra नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे, हैदराबादी स्टाईलमध्ये पत्ता.

लोक मजेदार कमेंट्स देत आहेत

हा एक पार्सलचा फोटो आहे, ज्यावर ग्राहकाचे नाव सलीम लाला लिहिले आहे. पार्सलमध्ये त्याचा पत्ता असा लिहिलेला आहे, “12-24/Z1, पाशा भाई की दुकान आके पूछ लो, सलीम लाला किधर रहते, सीधा घर तक लाके छोड़ते. चारमीनार, हैदराबाद.” सलीम लाला यांचा हा पत्ता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक या फोटोवर मजेदार कमेंट्स देत आहेत.

फ्लिपकार्टनेही केले मजेदार ट्विट

असाच एक फोटो जुलै 2020 ला सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यामध्ये असाच एक मजेदार पत्ता लिहिला गेला होता. राजस्थानच्या कोटामध्ये उदयवीर शक्तिवात यांनी लिहिले होते की, “मंदिर के सामने आते ही फोन लगा लेना में आ जाउंगा (मंदिर पहुंचें और मुझे बुलाएं, मैं इसे लेने आऊंगा).” इतकेच नाही, तर या फोटोवर फ्लिपकार्टने देखील मजेदार ट्विट केले आहे.