जाणून घ्या कोणत्या कुशीवर झोपल्याने होतात कोण-कोणते फायदे, अनेक आजारापासून होते सुटका

नवी दिल्ली : दिवसभराच्या धावपळीनंतर आपण झोप घेण्यासाठी बिछान्यावर पडतो. परंतु, कोणत्या कुशीवर झोपावे याबाबत आपल्याला माहिती नसते. आपण कोणत्या कुशीवर झोपतो याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. काही लोक सरळ झोपतात, तर काही डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपतात. अनेकदा चुकीच्या पोझिशनमध्ये झोपल्याने आपली प्रकृती सुद्धा बिघडते. आज आपण याबाबत माहिती घेणार आहोत.

1. डाव्या कुशीवर झोपने आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. यामुळे हृदयावर जास्त जोर पडत नाही, आणि ते चांगल्या प्रकारे काम करते.

2. नेहमी लोक डिनरच्या नंतर ताबडतोब झोपण्यासाठी जातात, अशावेळी डावीकडे तोंड करून झोपल्यास जेवण हळुहळु पचन होते. सोबतच शरीराचे तापमानसुद्धा चांगले राहाते, कारण शरीराच्या डावीकडे पचनतंत्र असते, आणि हृदयसुद्धा डावीकडे असते. परंतु याच्या उलट उजवीकडे झोपल्यास जेवण लवकर-लवकर पचन होते, जे शरीरासाठी खुप नुकसानकारक ठरते.

3. झोपताना उशी घेऊन कधीही सरळ झोपू नये, कारण याचा थेट परिणाम तुमच्या पाठीच्या कण्यावर होतो. जर तुम्ही डावीकडे तोंड करून झोपलात तर पाठीचा कणा सरळ राहतो आणि कोणताही त्रास होत नाही.

4. तर काही लोकांना पोटावर उपडे झोपण्याची सवय असते. पोटावर उपडे झोपू नये, असे केल्याने शरीराला सर्वात जास्त नुकसान होते, कारण पोटावर झोपल्याने शरीरावर जास्त वजन पडते. ज्यामुळे हृदयसंबंधी आजार होण्याचा भिती असते.

5. गरोदर महिलांनी डाव्या कुशीवर झोपणे सर्वात चांगले. कारण यामुळे गर्भातील बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. याशिवाय टाच, हात आणि पायांना सूज येण्याची समस्या सुद्धा होत नाही.

6. अनेकदा योग्यप्रकारे न झोपल्याने अ‍ॅसिडिटीसारखी समस्या होते. डावीकडे झोपल्याने पोटातील अ‍ॅसिड खालच्या बाजूला जाते, ज्यामुळे अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळ होत नाही.

7. जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर डावीकडे झोपल्याने आराम मिळतो. जेवण छोट्या आतड्यातून मोठ्या आतड्यात सहज पोहचते आणि सकाळी पोट स्वच्छ होण्यास मदत होते.