Facebook ने सांगितले का डाऊन झाला होता सर्व्हर, काही तासातच झाला होता 447 अरब रुपयांचा तोटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook), व्हॉट्सअप (WhatsApp) आणि इन्स्टाग्राम (Instagram) ची सेवा 4 ऑक्टोबर 2021 च्या रात्री अनेक तास बाधित होती. फेसबुकला (Facebook) याची मोठी किंमत मोजावी लागली. काही तासांपर्यंत सर्व्हर डाऊन राहिल्याने कंपनीला अरबो रुपयांचा तोटा (Financial Loss) सहन करावा लागला आहे. आता कंपनीने सर्व्हर डाऊन होण्याचे कारण सांगितले आहे.

इतर कोणतेही कारण नाही, आमच्या चुकीमुळेच
फेसबुकने सांगितले की, रेग्युलर मेंटनन्सच्या दरम्यान आलेल्या त्रुटींमुळे सर्व्हर डाऊन झाला. फेसबुकचे इन्फ्रास्ट्रक्चर व्हाईस प्रेसिडेंट संतोष जनार्दन यांनी म्हटले की, आमची सेवा कोणत्याही दुर्भावनापूर्ण कामामुळे नव्हे, तर आमच्याच चुकीमुळे बाधित झाली होती.

फेसबुकच्या सर्व्हरमध्ये समस्या
जनार्दन यांनी सांगितले की, ही समस्या तेव्हापासून सुरू झाली, जेव्हा इंजिनियर फेसबुकच्या ग्लोबल नेटवर्कवर रोजची कामे करत होते. या नेटवर्कमध्ये जगभरातील सेंटर्सचे कम्प्युटर, राऊटर, आणि सॉफ्टवेयर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेले आहेत. नियमित देखभालीदरम्यान एका चुकीच्या कमांडमुळे फेसबुक डाटा सेंटर डिस्कनेट झाले.

 

ऑडिट टूलमध्ये एक बग

त्यांनी म्हटले की, फेसबुक (Facebook) सिस्टमला अशा चुका पकडण्यासाठी डिझाईन केले आहे, परंतु याबाबतीत ऑडिट टूलमधील एका बगमुळे असे होऊ शकले नाही. त्या बदलामुळे एक दूसरी समस्या निर्माण झाली आणि फेसबुकच्या सर्व्हरपर्यंत पोहचणे अवघड झाले. मात्र ते काम करत होते.

फेसबुक संस्थापकांचे मोठे नुकसान
फेसबुकच्या इंजिनियर्सने समस्या ठिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक सिक्युरिटी लेयर्समुळे यामध्ये खुप वेळ लागला.
जनार्दन यांनी म्हटले, डाटा सेंटर्समध्ये एंट्री घेणे कठिण होते.
एकदा जेव्हा तुम्ही आत पोहचता तेव्हा हार्डवेयर आणि राऊटरला अशाप्रकारे डिझाईन केले आहे की,
फिजिकल संपर्क येऊनही त्यामध्ये दुरूस्ती करणे अवघड होईल.

काही तासांसाठी ठप्प झालेल्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअ‍ॅपला आणखी एका व्हिसलब्लोअर (Whistleblower) च्या खुलाशानुसार कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना भारतीय चलनात सुमारे 447 अरब रुपये (600 कोटी डॉलर) पेक्षा जास्त तोटा झाला.

 

श्रीमंतांच्या यादीतून घसरले होते मार्क झुकरबर्ग

फेसबुकला झालेला तोट्यामुळे श्रीमंतांच्या यादीत झुकरबर्ग एक स्थान घसरून मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या एक स्थान खाली आले होते.
सोशल मीडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये त्या दिवशी 4.9 टक्केची घसरण नोंदली गेली.
स्टॉकमध्ये सप्टेंबर मध्यापासूनच सुमारे 15 टक्केची घसरण दिसून आली आहे.
स्टॉकमध्ये झालेल्या बदलानंतर झुकरबर्ग यांची एकुण संपत्ती 12 हजार 160 कोटी डॉलरवर आली.
ब्लूमबर्गच्या यादीत फेसबुक सीईओंचे नाव बिल गेट्स यांच्या खाली गेले.

Web Title :- know why the facebook server down loss of 447 billion rupees in few hours mark zuckerberg

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Municipal Election | पुण्यात असणार ‘एवढे’ नगरसेवक आणि प्रभाग, कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश

Pension News | 3 लाखपेक्षा जास्त पेन्शनरला सरकारकडून मोठी भेट, ‘या’ तारखेपासून वाढवली रक्कम

PMC Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’ ! मिळणार 8.33 % दिवाळी बोनस आणि ‘एवढया’ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान