Kolhapur Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीला अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Kolhapur Crime | कोल्हापूर येथील करवीर तालुक्यातील (Karveer taluka) कणेरी माधवनगर येथील एक धक्कादायक घटना (Kolhapur Crime) उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या (Murder) करुन पतीने खुद्द आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गुरुवारी (16 सप्टेंबर) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. कोमल निशिकांत चव्हाण (वय 25,) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर, शशिकांत सुरेश चव्हाण (वय 30) असं आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

याबाबत माहिती अशी, कोमल व निशिकांत चव्हाण (Komal and Nishikant Chavan) ( रा.डवरी वसाहत, दौलतनगर कोल्हापूर ) यांचा 7 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 2 मुले असून निशिकांत हा गोकुळ शिरगाव एमआयडीसी (Gokul Shirgaon MIDC) मध्ये कामाला आहे. तो कामानिमित्त कणेरी येथील माधवनगरमधील एकता कॉलनी येथे दीपक पोवार यांच्या घरात भाड्याने राहत होतो. अलीकडच्या काही दिवसात पत्नी कोमलचे दुसऱ्या एकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय निशिकांतला आला. त्यामुळे या दोघा पती-पत्नीमध्ये सतत वाद झाला. याबाबत फिर्यादी संतोष चव्हाण (Santosh Chavan) यांनाही सांगितले होते. दरम्यान, कोमल सुधारली नाही तर मी तिला ठार मारणार, असे निशिकांत बोलत होता.

 

बुधवारी रात्री या पती-पत्नीत वाद झाला. या वादात पती निशिकांत याने चारित्र्याच्या संशयावरून नायलॉनच्या दोरीने कोमलचा गळा आवळून हत्या केली. त्यांनतर त्यानं गुरुवारी सकाळी फिर्यादी मामा संतोष चव्हाण यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. कोमलला ठार मारले आहे आणि मी स्वतः आत्महत्या (Suicide) करणार आहे असे सांगितले. मात्र काही वेळाने मामा आणि नरेंद्र दोघे घरात आले. मात्र, निशिकांत हा राहत्या घरात सिलिंग फॅनला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून घेऊन स्टूलवर आत्महत्या करत असल्याचा दिसला. पण दोरी तुटली आणि आत्महत्येचा प्रयत्न फसला. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात (Gokul Shirgaon Police Station) झाली नोंद झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास एपीआय प्रवीण पाटील (API Praveen Patil) करीत आहेत.

 

Web Title : Kolhapur Crime | husband murdered wife with rope and attempted suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BMC Recruitment -2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्ण संधी, दरमहा 25 हजार पगार; जाणून घ्या सविस्तर

PM Kisan | मोठी खुशखबर ! आता खात्यात येऊ लागतील ‘इतके’ हजार रुपये, जाणून घ्या

Pune Gang Rape | धक्कादायक ! ‘त्या’ 14 वर्षीय मुलीवरील सामुहिक बलात्काराचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याचे उघड, आणखी दोघांना अटक; 16 आरोपींनी केला अत्याचार, 19 जण अटकेत