Pune Gang Rape | धक्कादायक ! ‘त्या’ 14 वर्षीय मुलीवरील सामुहिक बलात्काराचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याचे उघड, आणखी दोघांना अटक; 16 आरोपींनी केला अत्याचार, 19 जण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Gang Rape | अल्पवयीन मुलीला मदत करण्याचा बहाणा करत तिचे अपहरण करून सामुहिक बलात्कार (Pune Gang Rape) केल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) आणखी दोन आरोपीला अटक केली आहे. त्यांनी देखील मुलीवर बलात्कार केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात संबंधित मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींची संख्या आता 16 वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या सर्व प्रकारचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे. चित्रीकरण नेमके कोणी केले व आता हे कोठे आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण 19 जणांना अटक केली आहे. त्यातील दोघेजण हॉटेल व्यवसायिक आहे. एक संबंधित मुलीचा मित्र तर उर्वरित 16 जण हे बलात्कार करणारे संशयित आरोपी आहेत.

मेहबूब बादशहा शेख (वय 27, रा. सुरक्षानगर, वैदवाडी, हडपसर) आणि इस्माईल लतीफ शेख (वय 36, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशोक कल्याण चव्हाण (वय 32, रा. शिवाजीनगर) आणि राजेश विठ्ठलराव मिसाळ (वय 41, रा. साठे वस्ती लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोन लॉजच्या व्यवस्थापकांची नावे आहेत. यातील चव्हाण याने लॉजच्या रजिस्टरमध्ये नोंद न करताच मुलगी आणि आरोपीला खोली भाड्याने दिली. तर मिसाळ याने लॉजच्या रजिस्टरमध्ये पीडित मुलीचे चुकीचे नाव व वय नोंदवले. या दोघांनी त्यांना नेमून दिलेल्या कामात हलगर्जी केल्याने तसेच आरोपीला गुन्हा करण्यात प्रोत्साहन आणि अपप्रेरणा दिल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या 14 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती.
त्यामुळे सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नव्याने अटक करण्यात आलेले आरोपी तसेच यापूर्वी अटकेत असलेले आरोपी यांच्याकडे
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.
त्यानुसार न्यायालयाने यापूर्वी अटक 14 आरोपींच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

दरम्यान संबंधित मुलगी पुणे स्टेशनवरून रेल्वेने दादर येथे
उतरल्यानंतर ठाण्यातील एका 32 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचे काल उघडकीस आले आहे.
या प्रकरणी आरोपीस वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) अटक केली आहे.
राजेश शांताराम कुंभार (वय 32, रा. शांताबाई चाळ, कोपरी, ठाणे पूर्व ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
वानवडी पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी (Sudha Chaudhary) या गुन्ह्याचा तपास करत आहे.

Web Titel :- Pune Gang Rape | Shocking! Two more arrested for gang-raping 14-year-old girl 16 accused tortured, 19 arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Jewellery Retailers Revenue | सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्यांचा ‘महसूल’ 12-14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता – Crisil

Pune Court | बालेवाडी येथील जागा हडपण्यासाठी बनावट खरेदीखत तयार करून सेवानिवृत्त अधिकार्‍याची फसवणूक; उत्तुंग पाटीलला अटक

Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश