Kolhapur Crime | खळबळजनक ! प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय शाळकरी मुलाची हत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | कोल्हापुरच्या पन्हाळा (Panhala) तालुक्यातील सातवे येथील शाळकरी मुलाची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून ही हत्या (Murder) करण्यात आल्याचे समजते. मोन्या उर्फ शिवतेज विनायक घाटगे (वय,18) असं त्या मुलाचे नाव आहे. मांगले (ता. बत्तीस शिराळा) गावच्या हद्दीत शिवतेजला जबर माराहाण झाली होती उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू (Died) झाला आहे. ही खळबळजनक घटना काल (बुधवारी) रात्री मांगले गावच्या परिसरात धनटकी येथील शेतात (Kolhapur Crime) घडली आहे.

मोन्या उर्फ शिवतेज विनायक घाटगे (Shivtej Vinayak Ghatge) याचा मृतदेह कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. मात्र, संशयित आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं म्हणत त्याचे नातेवाईक आंदोलन करत आहेत. या घटनेमुळे हाॅस्पीटल परिसरात प्रंचड जमाव गोळा झाला आहे. शिवतेज याने मोठा प्रकल्प करून त्यात चांगला जम बसवला होता. स्थानिक राजकारणात देखील तो सक्रिय झाला होता. या घटनेमुळे कोल्हापुर (Kolhapur) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Titel :- Kolhapur Crime | murder 18 year old schoolboy over love affair village girl kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे