Kolhapur Crime News | मस्करी बेतली जीवावर ! एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याची हत्या, कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | कोल्हापूरमधील कारागृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मस्करी केल्याच्या रागातून एका कैद्याने दुसऱ्या कैद्याची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. ही घटना कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात काल रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे आता कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Crime News)

 

काय घडले नेमके?
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा झालेला सतपालसिंग हा 2017 पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. तर आरोपी गणेश गायकवाड हा ठाणे येथे हत्या केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 2021 पासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. यादरम्यान सतपालसिंग आणि गायकवाड यांची एकमेकांशी ओळख झाली आणि ते दोघे चांगले मित्र बनले. या दोघांना कारागृहातील रुग्णालय स्वच्छतेचे काम देण्यात आले होते. (Kolhapur Crime News)

घटनेच्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री हे दोघे रुग्णालयात झोपले असताना मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास गायकवाड याने सतपालसिंगच्या डोक्यात दगड घातला.
यानंतर मोठा आवाज होताच ड्युटीवर असलेले दोन शिपाई रुग्णालयात धावत आले त्यावेळी सतपालसिंग हा गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला.
त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कैदी सतपालसिंग आणि गायकवाड हे दोघे नेहमीच एकमेकांची चेष्टा मस्करी करीत होते.
या चेष्टा मस्करीतून त्याची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Kolhapur Crime News | a prisoner was finished for a trivial reason in kalamba jail in kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tagenarine Chanderpaul’s century | तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉलने रचला इतिहास; पिता- पुत्रांनी ‘या’ यादीमध्ये मिळवले स्थान

Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…’

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का; जवळपास ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश