Kolhapur Crime | धक्कादायक! कोल्हापुरात शेती परवडत नसल्याने तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

0
429
Kolhapur Crime | young farmer committed suicide in kolhapur as he could not afford agriculture
file photo

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime | कोल्हापूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शेती परवडत नसल्याने एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यातील वेंगरुळ येथील ओंकार मेघन पंडित (Omkar Meghan Pandit) या शेतकरी युवकाने कर्जाला (Loan) कंटाळून गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मृत ओंकार हा शेती करत होता. त्याचा ट्रॅक्टर होता. शेती व ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज तसेच हातउसने घेतललेले पैसे यामुळे तो मोठ्या अडचणीत सापडला होता. यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली (Mental Stress) होता. सोमवारी तो ‘मळव’ नावाचे शेतातील मंदिरात जातो, असे घरी सांगून घरून गेला तो माघारी परत आलाच नाही. (Kolhapur Crime)

त्याने मंदिराच्या आवारात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.
खूप वेळ झाला तरी तो घरी न आल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली तेव्हा त्याचा मृतदेह मंदिराच्या खोलीत लटकताना आढळून आला.
या घटनेची माहिती मृत ओंकारचे चुलते विजय पंडित (Vijay Pandit) यांनी भुदरगड पोलिसांना (Bhudargarh Police) दिली.
त्याच्या माघारी आई, वडील, पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
अवघ्या 26 वर्षांच्या तरूणाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली आहे.

Web Title :- Kolhapur Crime | young farmer committed suicide in kolhapur as he could not afford agriculture

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा