Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना ! पैशाच्या देण्या-घेण्यातून तिघांनी जीवलग मित्राची केली निर्घृण हत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील (Kolhapur Crime) तीन युवकांनी आपल्याच मित्राची निर्घृण हत्या (Murder in Kolhapur) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी तीघा युवकांनी पैशांच्या देण्याघेण्यातून हत्या केल्याचे समजते. आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून मृतदेह अर्धवट जाळून टाकला आहे. ही घटना समोर आल्यानंतर काही तासात पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला असून दोघांना अटक (Arrested) करण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी, प्रशांत संजय भिसे (Prashant Sanjay Bhise) (वय, 28 रा.दानोळी, ता. शिरोळ) असं हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर प्रताप उर्फ गुंड्या संजय माने (Pratap/Gundya Sanjay Mane), अमोल उर्फ दाद्या दत्ता हराळे (Amol /Dadya Datta Harale) आणि सागर अजित होगले (Sagar Ajit Hogale) असे आरोपींचे नावे आहेत. तर, मृत प्रशांत आणि तिंघे आरोपी एकमेकांचे जीवलग मित्र होते. प्रशांत हा बेरोजगार असल्याने त्याने आपल्या मित्रांकडून काही पैसे उसणे घेतले होते. (Kolhapur Crime)

15 डिसेंबर रोजी मृत प्रशांत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी पैशांच्या कारणावरुन प्रशांतचा आपल्या मित्रांसोबत वाद झाला. हा वाद मारामारीत झाला. यावेळी एकाने प्रशांतवर धारदार शस्त्राने वार केले. ज्यात प्रशांतचा जागीच मृत्यू (Died) झाला. यानंतर खुनाचा पुरावा गायब करण्यासाठी आरोपींनी प्रशांतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याची दुचाकी एका विहिरीत टाकून दिली.

 

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांतच जयसिंगपूर पोलिसांनी (jaisinghpur police station) हत्येचा छडा लावला.
पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रताप माने आणि सागर होगले यांना अटक केलीय.
तर, अमोल उर्फ दाद्या दत्ता हराळे हा संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Kolhapur Crime | young man murdered by 3 friends in the money dispute attack with sharpen weapon jaisinghpur of kolhapur district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

31st December | 7 दिवसात उरकून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे, अन्यथा नवीन वर्षात होईल अडचण; जाणून घ्या

कामाची बातमी ! जाणून घ्या Aadhaar-Voter ID लिंक करण्याच्या 3 सर्वात सोप्या पद्धती, SMS ने सुद्धा होईल काम

PM Kisan Sanman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 जानेवारीलाच मोदी सरकारकडून भेट; 4 हजार रुपये थेट खात्यात पाठवणार, जाणून घ्या